मुंबई : (Foreign Funding) दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान दररोज हजारो विद्यार्थ्यांना मोफत अन्न आणि पिण्याचे पाणी पुरवून चर्चेत आलेला गाझियाबादचा मोहम्मद जुनैद सध्या कायदेशीर आणि पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात सापडला आहे. आंदोलकांना सातत्याने अन्नधान्य व पाण्याची रसद पुरवल्यामुळे जुनैदची उत्तर प्रदेश पोलिसांकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. आंदोलनाच्या काळात दररोज हजारो विद्यार्थ्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर जेवण आणि पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नेमका पैसा कुठून येत होता, याबाबत पोलिसांना गंभीर संशय आहे.(Foreign Funding)
एका सामान्य घरातील तरुणाकडे दररोज लाखो रुपयांचा खर्च झेपेल इतका मोठा निधी कसा उपलब्ध झाला? यामागे कोणती संस्था किंवा व्यक्ती आहे? की यामागे काही छुपे अजेंडे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. जंतर-मंतरवरील आंदोलनांना थेट परदेशी निधी मिळत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरल्याने यूपी पोलिसांकडून मोहम्मद जुनैदची कसून चौकशी होत आहे. जुनैदला मिळालेला निधी हा परदेशी स्त्रोतांकडून किंवा अन्य मार्गाने आला आहे का, या दिशेने उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास सुरू आहे.(Foreign Funding)
पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे आणि तपास यंत्रणांच्या फेऱ्यांमुळे जुनैदच्या कुटुंबात सध्या भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. "आम्ही केवळ मानवतेच्या नात्याने आणि सेवेच्या भावनेने आंदोलक विद्यार्थ्यांना मदत करत होतो," असा दावा जुनैदच्या निकटवर्तीयांकडून केला जात असला, तरी पोलीस केवळ दाव्यांवर समाधान न मानता पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यावर ठाम आहेत.(Foreign Funding)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक