जंतरमंतरवरील सीजेपी आंदोलनात गुन्हेगारही सहभागी; 2,873 जणांचे गुन्हेगारी रेकॉर्ड; दिल्ली पोलिसांचा सरकारला अहवाल

CJP Protest
 
मुंबई : (CJP Protest) जंतरमंतर येथे झालेल्या सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या 2,873 व्यक्तींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात केला आहे. या 2,873 जणांपैकी 989 जण गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी किंवा संबंधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, फेस रेकग्नेशन व्हॅनद्वारे आंदोलनातील सहभागींची ओळख पटविण्यात आली. त्यापैकी 2,402 जणांची ओळख 'क्राईम-कुंडली' तर 471 जणांची ओळख डॉसिअरच्या आधारे निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.(CJP Protest)
 
अहवालानुसार, या व्यक्तींवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद असून त्यामध्ये 101 जणांवर खुनाचे, 62 जणांवर खुनाचा प्रयत्न, 284 जणांवर दरोडा किंवा लूटमार, 61 जणांवर बलात्कार, 6 जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत, 25 जणांवर महिलांचा विनयभंग, 229 जणांवर शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन, 135 जणांवर हिसकावून चोरी, 19 जणांवर अपहरण, तसेच 67 जणांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.(CJP Protest)
 
याशिवाय, 1,884 जणांवर भारतीय दंड संहिता (IPC)/भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर विशेष कायद्यांअंतर्गत विविध गुन्हे नोंद असल्याचेही अहवालात म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी हा अहवाल सरकारकडे सादर केला असून, आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत ही माहिती देण्यात आली आहे.(CJP Protest)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर