चारकोप सेक्टर ७ येथील तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी आमदार संजय उपाध्याय यांचा पुढाकार

    28-Jul-2026
Lake Sanitation
 
मुंबई : (Lake Sanitation) चारकोप सेक्टर ७ येथील साईधामसमोरील तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी पुढाकार घेतला असून तलावाच्या स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामाची मंगळवार दि.२८ रोजी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
 
"अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे गाळ, जलपर्णी आणि साचलेल्या कचऱ्यामुळे तलावाचे मूळ स्वरूप हरवले होते. त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने कामाची गुणवत्ता, नियोजन आणि गती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.तलावाची स्थिती अतिशय दयनीय झाली होती. परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संवर्धन आणि स्वच्छ, सुरक्षित व सुंदर परिसर घडविण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे." अशी प्रतिक्रिया आमदार संजय उपाध्याय यांनी दिली आहे.(Lake Sanitation)
 
यावेळी दिनेश झाला, शिवानंद शेट्टी, पदाधिकारी-कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.(Lake Sanitation)
 
 




संबंधित मजकूर