बेस्टमध्ये ३६४ बस वाहकांची भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, चालकांची भरती न झाल्याने प्रश्नचिन्ह

    28-Jul-2026
BEST Employees
 
मुंबई : (BEST Bus Conductor Recruitment) बेस्ट बस अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना बेस्ट प्रशासनाने बस चालकांची भरती न करता ३६४ बस वाहक पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. त्यामुळे चालकांची कमतरता असताना वाहकांची भरती करण्याला प्राधान्य का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
बेस्ट प्रशासनाच्या माहितीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
 
भरती प्रक्रियेत खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), विशेष मागास प्रवर्ग (SBC), इतर मागास प्रवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) यांच्यासाठी नियमानुसार आरक्षण लागू राहणार आहे.(BEST Bus Conductor Recruitment)
 
उमेदवार किमान दहावी (एसएससी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला किंवा नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना असणे आवश्यक आहे.(BEST Bus Conductor Recruitment)
 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्षे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची किमान उंची १६४ सेंटीमीटर आणि वजन ४५ किलो असणे आवश्यक आहे.(BEST Bus Conductor Recruitment)
 
निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा (CBT) द्वारे होणार आहे. परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तसेच मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान या विषयांवरील प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक विषय १० गुणांचा असून प्रत्येक विषयात किमान ३ गुण आणि एकूण किमान ९ गुण मिळवणे आवश्यक राहील.
 
अर्ज शुल्क :
 
खुला प्रवर्ग : ₹१,०००
राखीव प्रवर्ग : ₹५००
 
 




संबंधित मजकूर