मुंबई : (Electric Double Decker Bus) तब्बल तीन वर्षांच्या विलंबानंतर बेस्ट उपक्रमाच्या १५० इलेक्ट्रिक डबल-डेकर बस खरेदीचा रखडलेला प्रस्ताव पुन्हा मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. सुधारित भाडे दराला मंजुरी मिळवण्यासाठी बेस्ट प्रशासन हा प्रस्ताव लवकरच समितीसमोर सादर करण्याच्या तयारीत आहे.
समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा
बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले की, विद्यमान करारानुसार बेस्टला आतापर्यंत ५० इलेक्ट्रिक डबल-डेकर बस प्राप्त झाल्या आहेत. मात्र, करारातील तांत्रिक आणि करारविषयक वादांमुळे उर्वरित १५० बसांचा पुरवठा गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे.
या प्रकरणात कायदेशीर मत घेण्यासाठी प्रस्ताव अॅटर्नी जनरल यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक समितीने संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रति किलोमीटर लीज पेमेंटमध्ये किरकोळ वाढ करण्याची शिफारस केली आहे.(Electric Double Decker Bus)
सोनिया सेठी यांनी सांगितले की, सर्व बाबींचा विचार करून सुधारित प्रस्ताव समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्याची तयारी सुरू आहे.(Electric Double Decker Bus)
मंजुरीनंतर सुरू होणार बसांचा पुरवठा
समितीची मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित १५० इलेक्ट्रिक डबल-डेकर बसांचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बेस्टच्या सार्वजनिक वाहतूक सेवेला मोठी चालना मिळणार आहे.(Electric Double Decker Bus)
इलेक्ट्रिक बस ताफ्यात मोठी वाढ
या नव्या बस दाखल झाल्यानंतर बेस्टचा इलेक्ट्रिक बस ताफा अधिक सक्षम होईल. मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना अधिक क्षमतेची आणि पर्यावरणपूरक सेवा उपलब्ध होणार आहे.(Electric Double Decker Bus)
इलेक्ट्रिक डबल-डेकर बस त्यांच्या अधिक प्रवासी क्षमतेमुळे आणि शून्य प्रदूषण या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.
या बसांमुळे मुंबईतील शाश्वत आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होईल. तसेच, जास्त प्रवासी असलेल्या मार्गांवर डिझेल बसवरील अवलंबित्व कमी करण्यासही मदत होणार आहे.(Electric Double Decker Bus)