आंदोलन झालं, आता अभिजीत दिपके बोहोल्यावर चढणार! लग्नासाठी स्थळ येत असल्याचा आईनेच केला खुलासा

    28-Jul-2026
Abhijeet Dipke
 
नवी दिल्ली : (Abhijeet Dipke) मी आता देशाचा झालो आहे, मी फक्त तुमचा मुलगा नाही, असे ठणकाऊन सांगणाऱ्या अभिजीत दिपकेच्या लग्नाची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय राजकारण आणि चळवळीत असतानाही घरच्यांनी अभिजीत दिपकेच्या लग्नासाठी तगादा लावल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. अभिजीत दिपके आता जेन-झी आंदोलनाचा चेहरा बनला होता. त्याने सीजेपी या चळवळीची स्थापना केली आणि आंदोलनाला व्यापक रूप आणले. त्याच्या आईने यंदा जानेवारीपर्यंत अभिजीत दिपके लग्न करेल, अशी आम्हाला आशा आहे, असे म्हटले आहे.(Abhijeet Dipke)
 
“त्याच्या आंदोलन सुरू करण्यापूर्वीपासून लग्नासाठी मागणी येत होती. आता आंदोलन झाल्यानंतरही इच्छुक वधूंची स्थळे येणे सुरूच आहेत,” असे त्याची आई अनिता दिपके यांनी सांगितले. त्याच्या लग्नाची बोलणी सुरू केल्यावर तो आमच्याशी फार बोलत नाही. फक्त हसून उत्तर देणं टाळतो, असेही त्या म्हणाल्या. पण आता आंदोलन संपले आहे, तो घरी येईल तेव्हाच त्याच्यापुढे हा विषय काढणार आहे, असेही त्या म्हणाल्या.(Abhijeet Dipke)
 
अभिजीतने पुकारलेल्या आंदोलनाचा फटका कुटूंबाला बसल्याचेही त्यांनी सांगिलते. तो आंदोलनात उतरल्यानंतर धमक्यांचे फोन येऊ लागल्याने आम्ही चिंतेत होतो, असेही त्या म्हणाल्या आहेत. काही काळ कोकणात आपल्या नातेवाईकांकडे राहून त्यांनी पुन्हा छत्रपती संभाजी नगरात आपल्या राहत्या घरी मुक्काम हलवला होता. त्याने आम्हाला घरी आपल्या राजकीय निर्णयांबद्दल काहीच कळवले नव्हते, असेही त्या म्हणाल्या.(Abhijeet Dipke)
 
“अभिजीत इतके मोठे पाऊल उचलेल आणि तो राजकारणात येईल, असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही त्याच्या मुलाखती पाहिल्यानंतर या गोष्टी कळत गेल्या”, असे त्या म्हणतात. त्याच्या लहानपणीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला आहे. लहानपणी अगदी शांत स्वभावाचा असणारा अभिजीत आता मोठमोठ्या घोषणा देतो याचेच आम्हाला आश्चर्य वाटते. घरात अगदी कामापुरते बोलणारा अभिजीत आता भाषणे आणि मुलाखती देतो हे पाहून आम्हाला त्याचे बालपणीचे दिवस आठवतात. त्याने लहानपणी कधीही कथाकथन किंवा वत्कृत्व स्पर्धेत भाग घेतल्याचे आम्हाला आठवत नाही, असेही अनिता यांनी सांगितले. (Abhijeet Dipke)
 
तो नेहमी शांत मुलगा होता. त्याचा आवाज कधी वाढला किंवा एखाद्या गोष्टीमुळे तो संतापला आहे, असे आम्ही कधीही पाहिले नाही. तो आता टिव्हीवर ज्या प्रकारे बोलतो आहे हे आमच्यासाठीही आश्चर्यकारक आहे. त्याने कोविड काळात १५ गरीबांना मदत केली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.
 
अभिजीतला दहावीत ९६ टक्के गुण मिळाले होते. मात्र, अभियांत्रिकी क्षेत्रात त्याने जावे, असा आमचा अट्टहास होता. त्यामुळे त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्याला केवळ ६५ टक्के गुण मिळाले. त्याच्या मागे अभियांत्रिकीचा ससमीरा लावणे ही आमची चूक होती, असेही त्या म्हणाल्या. त्याचे वडिल अभियंता असल्याने मुलानेही याच क्षेत्रात यावे, असा तगादा आम्ही लावला होता. त्याला सिंहगड विद्यापीठात आम्ही प्रवेश मिळवून दिला. मात्र, त्याला आवडच नसल्याने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला.(Abhijeet Dipke)
 
जेव्हा त्याला कानाखाली लगावण्यात आल्याचा व्हिडिओ मी टिव्हीवर पाहिला तेव्हा आई म्हणून मला दुःख झालं होतं. तेव्हा मी रडले. त्यावेळी मी घाबरून त्याला फोन केला होता. तेव्हा तो म्हणाला आई चिंता करू नकोस, आता मी देशाचा आहे. फक्त तुमचाच नाही.(Abhijeet Dipke)
 
 




संबंधित मजकूर