नवी दिल्ली (Nepal Indian Currency New Rule): १० वर्षांची बंदी उठवून नेपाळ सरकारने दोनशे आणि पाचशे रुपयांच्या भारतीय चलनी नोटांच्या वापरास मंजुरी दिली आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या द्विपक्षीय रणनितीचा हा विजय मानला जात आहे. या निर्णयाने दोन्ही देशातील नागरिक कोणत्या मध्यस्तींशिवाय नोटा सीमेपलीकडे नेऊ शकतील. ज्यामुळे अनेक वर्षांपासून चालत असलेल्या चलन समस्या पूर्णपणे दूर होतील.(Nepal Indian Currency New Rule)
नेपाळ राष्ट्र बँकेने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय दोनशे आणि पाचशेच्या नोटा आता नेपाळमध्ये आणता आणि बाहेर नेता येतील. मात्र प्रति व्यक्ती रुपये पंचवीस हजार पर्यंतचीच मर्यादा लागू राहणार आहे. भारतात २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर नेपाळमध्ये शंभर रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेल्या नोटांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे भारतीय पर्यटक आणि व्यवसायिकांना व्यवहार करताना अनेक अडचणी येत होत्या.(Nepal Indian Currency New Rule)
या नवीन निर्णयामुळे पर्यटन, व्यापार आणि दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नेपाळ सरकारने दशकभरापुर्वीची बंदी उठवून, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नवीन भारतीय चलनी नोटांच्या वापरास मंजुरी दिली आहे. नेपाळ सरकारच्या या निर्णयाचे भारत-नेपाळ आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल मानले जात आहे.(Nepal Indian Currency New Rule)