मी ‘स्ट्रीट फायटर’, ‘एसी रूम’मधला ‘ॲक्टिव्हीस्ट’ नव्हे : धर्मेंद्र प्रधान

    27-Jul-2026

Dharmendra Pradhan
नवी दिल्ली : राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मौन सोडले आहे. मी एक स्ट्रीट फायटर आहे, एसी रूममध्ये बसून राहणारा ॲक्टिव्हीस्ट नाही, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि धर्मेंद्र प्रधान यांची संसदेच्या कॉरिडोरमध्ये भेट झाली त्यावेळी हे प्रत्युत्तर दिले आहे. या भेटीपूर्वीच प्रधान यांचे संसदेत भाजप नेत्यांनी स्वागत केले आणि त्यांना पगडी घालून त्यांचा सन्मान केला.
 
जयराम रमेश यांनी ‘इट हॅपन्स’, असे म्हणत प्रधान यांना धीर दिला, पण त्यावेळी प्रधान म्हणाले ‘नथिंग हॅपन’ (काहीही झालेले नाही). त्यानंतर म्हणाले, “मी रस्त्यावर उतरून लढणारा योद्धा आहे. एसी खोलीत बसून राहणारा ॲक्टिव्हीस्ट नाही.” त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी दिलेले हे उत्तर खूप सूचक आहे.
 
पेपर माफियांच्या विरोधात २०२४चा कायदा आणि नवा कायद्यात अंतर काय?
 
केंद्र सरकारने पेपरफुटीची प्रकरणे रोखण्यासाठी सार्वजनिक परिक्षा संशोधन विधेयक २०२६ सादर केले आहे. सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे बिल मांडले. दोन वर्षापूर्वी लागू केलेल्या या कायद्यात नेमकं अंतर काय आहे? जाणून घ्या.
 
- अँटी पेपर लीक कायद्यात विविध प्रकारच्या दोषींसाठी स्वतंत्र तरतूदी करण्यात आल्या आहेत. फक्त एकटा व्यक्ती या प्रकरणात आढळल्यास स्वतंत्र तरतूदी आणि टोळीचा सदस्य असल्यास वेगळी कारवाई, असा नियम होता.
- नव्या कायद्यात केवळ संघटीत टोळ्यांच्या सदस्यांवरच कारवाईची तरतूद नाही, तर त्याला मदत करणाऱ्या प्रत्येक संस्थांवर कारवाई होणार आहे. बायोमॅट्रीक प्रक्रिया किंवा प्रश्नपत्रिकांच्या वाहतूकीत सहभागी झालेल्या एजन्सीचे सदस्य, संचालक, वरिष्ठ व्यवस्थापक किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे संबंधित दोषी आढळल्यास पूर्वी पाच वर्षांची शिक्षा होती आता ती १० वर्षांची करण्यात आली असून एक कोटींचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच मंत्र्याने स्वेच्छेने राजीनामा दिला!
ज्यावेळी धर्मेंद्र प्रधान संसदेत पोहोचले त्यावेळेस एका खासदाराने टीपण्णी करत म्हटले की, “पहिल्यांदाच एका मंत्र्याने कुठलेही आरोप नसताना स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.”





संबंधित मजकूर