सोशल मीडियावर फेक न्यूजचा पूर; ४०० हून अधिक हँडल्सवर कारवाई

दिल्ली पोलिस दिशाभूल करणाऱ्या पोस्टविरोधात विशेष मोहीम

Delhi Police Fake News
 
नवी दिल्ली : (Delhi Police Fake News) नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावरील सर्व घडामोडींवर दिल्ली पोलीस सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती मध्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोहित राजबीर सिंह यांनी दिली.
 
जंतर-मंतर येथे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात खोटी, दिशाभूल करणारी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आलेली माहिती प्रसारित होत आहे. या अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत नागरिकांनी कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची तथ्य पडताळणी करावी, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत केले. (Delhi Police Fake News )
 
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आंदोलनाशी संबंधित अनेक पोस्ट, व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, त्यामध्ये अनेक पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून फेक न्यूज, एआय-निर्मित मजकूर, डीपफेक व्हिडिओ आणि एडिटेड क्लिप्सबाबत नागरिकांना नियमित माहिती दिली जात आहे. (Delhi Police Fake News )
 
पत्रकार परिषदेत पोलिसांनी काही उदाहरणेही मांडली. २० जुलै रोजीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट करत दिल्ली पोलिसांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला. (Delhi Police Fake News )
 
दिल्ली पोलिसांच्या तपासात पाकिस्तानमधून चालविल्या जाणाऱ्या काही सोशल मीडिया खात्यांकडून आंदोलनाशी संबंधित खोटा मजकूर प्रसारित केला जात असल्याचेही समोर आले आहे. संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अशा खात्यांचा शोध सुरू असून, आतापर्यंत ४०० हून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी काही हँडल्स यापूर्वी 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यानही दिशाभूल करणारी माहिती पसरविताना सक्रिय असल्याचे पोलिसांनी नमूद केले. (Delhi Police Fake News )
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर