नवी दिल्ली : जंतर मंतर येथे गेले ३५ दिवस अभिजीत दिपके आणि कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलकांची अहोरात्र सेवा करणाऱ्या मोहम्मद जुनैद उर्फ जुनेदभाई यांना आपले अश्रू अवावर झाले आहेत. अभिजीत दिपके त्यांचा फोनही उचलत नाही, त्यांच्याशी कुठलाही संपर्क केला नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यांच्या अश्रू ढाळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान दिपके आणि त्यांची टीम 'रेझिगनेशन पार्टी' करण्यात व्यस्त होते.
मोहम्मद जुनैद हे आंदोलनस्थळी सर्वांना मदत करण्याच्या आणि त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रसिद्ध होते. आंदोलन सुरू झाल्यापासून जेव्हा तितकासा प्रतिसाद नव्हता तेव्हापासून त्यांनी अभिजीत दिपके आणि टीमची काळजी घेतली होती. मात्र, ज्यावेळी आंदोलन माघारी घेतले, त्यानंतर मात्र, जुनैदभाईंचा फोन दीपकेने उचलणे बंद केले आहे. जुनैदभाईंनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली आहे.
"आपण एखादा पाळीव प्राणी जर २४ तासांसाठी सोबत ठेवला तरी आपला जीव त्याच्यावर जडतो, इथे तर माणसं होती. त्यांच्यासोबत मी गेले ३५ दिवस सोबत होतो. एकदा भेटून निरोप घेताही आला नाही. आता माझ्याकडे त्यांच्या कुणाचाही संपर्क नाही. एकदा माझ्यासोबत हात तरी मिळवायचा. दोन शब्द बोलायचे. ही काही धर्माची गोष्ट नाही. इथे हिंदू-मुस्लीम हा प्रश्न आला नाही. आता ते आम्हाला कधी सापडणार नाही. त्यांचा संपर्क माझ्याकडे नाही.", अशी खंत त्यांनी व्यक्त करुन दाखवली.
दिपके आणि टीम पार्टीत व्यस्त
दरम्यान अभिजीत दिपके आणि त्यांच्या टीमच्या रेझिगनेशन पार्टीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या आंदोलनात दिपके आणि त्यांच्या भोवतालची खास टीमच या पार्टीत उपस्थित होते.विशेष म्हणजे जुनैद यांच्यापासून सुमारे दोनशे मीटर परिसरात ही पार्टी केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
Mohammad Junaid, who became famous for distributing food during the CJP protest, is now crying because Abhijeet Dipke threw a party celebrating Dharmendra Pradhan's resignation and didn't even invite him.
To make matters worse, he isn't even picking up his phone.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे राहणारे मोहम्मद जुनैद यांचे एक मोबाईलचे दुकान आहे. त्यांनी गेले ३५ दिवस मोफत अन्न आणि पाण्याची आंदोलकांसाठी सोय केली होती. सीजेपीने उत्तर प्रदेश पोलीसांवर आरोप करत जुनैद यांच्या कुटूंबियांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे. सौरव दास यांनी जुनैद यांच्या कुटूंबियांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मेरठ पोलीसांनी आपण कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा नजरकैदेत ठेवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या संकटाच्या काळात जुनैद दिपकेंना संपर्क करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद सीजेपीकडून येत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त करुन दाखवली आहे.