मुंबई: (Bengaluru Student Protest) कर्नाटकच्या बंगळुरू येथील फ्रीडम पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्लीतील २०२० च्या दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी केल्याची घटना समोर आली आहे. पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित
मुंबई : (Bengaluru Student Protest) लाठीमाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात एका तरुणीने या दोघांच्या समर्थनार्थ पोस्टर दाखवल्याचा आरोप असून, तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणीने सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या आणि वातावरण चिघळवण्याच्या उद्देशाने ही पोस्टर्स प्रदर्शित केली होती. सध्या तिची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांची मदत घेतली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, २०२० मधील दिल्लीतील दंगलीप्रकरणी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यावर गंभीर आरोप असून, ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.(Bengaluru Student Protest)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जुलै रोजी फ्रीडम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान घडली. कर्नाटक विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांसह विविध विद्यार्थी संघटनांचे सुमारे १,००० ते १,५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्ते नीट परीक्षेशी संबंधित मुद्दे, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकांनी गर्दीत एका तरुणीच्या हातात 'उमर खालीद' व 'शरजील इमाम' च्या समर्थनार्थ पोस्टर्स असल्याचा दावा केला.(Bengaluru Student Protest)
पोलिस तक्रारीनुसार, पोलिसांनी त्या तरुणीकडे जाऊन पोस्टर्स जप्त करण्याचा प्रयत्न करताच, आंदोलनातील इतर काही जणांनी तिला गर्दीत लपवले. मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित असल्यामुळे पोलिसांना तात्काळ ना संबंधित तरुणीला ताब्यात घेता आले, ना ते पोस्टर्स जप्त करता आले. तक्रारीनुसार, ही घटना सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू होती. पोलिसांच्या मते, अशा प्रकारची पोस्टर्स जाणीवपूर्वक दाखवून आंदोलनाचे वातावरण प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(Bengaluru Student Protest)
सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी फ्रीडम पार्क परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तसेच ड्युटीवरील पोलिसांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू केली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात तरुणीविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करणे आणि भडकाऊ कृत्य केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलीस व्हिडिओ फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे संबंधित तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपलब्ध सर्व पुराव्यांची तपासणी सुरू असून, ओळख निश्चित झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.(Bengaluru Student Protest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक