मुंबई(Ritu Tawde Ashadhi Ekadashi Maha Puja) : आषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील 'प्रतिपंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि त्यांचे पती राजेश तावडे यांच्या हस्ते शनिवारी पहाटे विधिवत महापूजा व महाअभिषेक करण्यात आला. यावेळी मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसह मुंबई महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.(Ritu Tawde Ashadhi Ekadashi Maha Puja)
महापूजेनंतर महापौर रितू तावडे यांनी पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या मुंबईकरांसाठी वडाळ्यातील विठ्ठल मंदिर हे 'प्रतिपंढरपूर' म्हणून श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगितले. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संपूर्ण मुंबईच्या प्रगतीसाठी, नागरिकांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांततेसाठी विठुरायाकडे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.(Ritu Tawde Ashadhi Ekadashi Maha Puja)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात मंदिर परिसर दुमदुमून गेला. महापूजेनंतर महाआरती करण्यात आली तसेच उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.(Ritu Tawde Ashadhi Ekadashi Maha Puja)
भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी महापालिका, मंदिर विश्वस्त मंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.(Ritu Tawde Ashadhi Ekadashi Maha Puja)
या प्रसंगी एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर, श्री विठोबा गणपती आणि महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय दिघे, सचिव प्रशांत म्हात्रे, खजिनदार नितीन म्हात्रे, सभासद उदय म्हात्रे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.(Ritu Tawde Ashadhi Ekadashi Maha Puja)