मुंबई, (Pralhad Joshi Education Ministry): केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार त्यांचा स्वीकारला असून, नवीन शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.(Pralhad Joshi Education Ministry)
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला. तसेच, नवीन शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत प्रल्हाद जोशी हे त्यांच्या विद्यमान खात्यांसह शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील.(Pralhad Joshi Education Ministry)
कर्नाटकातील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा खासदार राहिलेले प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणूनही काम केले आहे.(Pralhad Joshi Education Ministry)
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून जोशी यांनी देशातील स्वच्छ ऊर्जा क्षमतेच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०३० पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय व जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा क्षमता निर्माण करणे आणि २०७० पर्यंत 'नेट-झिरो' उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रमांचे ते नेतृत्व करत आहेत.(Pralhad Joshi Education Ministry)
दरम्यान, नवीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, तोपर्यंत शिक्षण मंत्रालयाचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे राहणार आहे.(Pralhad Joshi Education Ministry)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.