मुंबई (Malad Creek Plastic Interceptor Project): मुंबईतून नदी-नाल्यांमार्गे समुद्रात जाणाऱ्या प्लास्टिक आणि इतर तरंगत्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी मालाड खाडीत 'द ओशन क्लीनअप' संस्थेचा इंटरसेप्टर पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाची भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.(Malad Creek Plastic Interceptor Project)
'द ओशन क्लीनअप' ही जागतिक स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, प्लास्टिक फिशर आणि युनायटेड वे मुंबई यांच्या सहकार्याने हा पायलट प्रकल्प राबवत आहे. मालाड आणि ट्रॉम्बे खाडी येथे इंटरसेप्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्रात जाणारा प्लास्टिकसह इतर तरंगता कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबईतून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक अरबी समुद्रात वाहून जाते. हे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.(Malad Creek Plastic Interceptor Project)
प्रायोगिक टप्प्यात इंटरसेप्टर प्रणालीद्वारे कचरा संकलनासाठी महापालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच सार्वजनिक निधीची बचत होण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.(Malad Creek Plastic Interceptor Project)
अलीकडील मुसळधार पाऊस आणि भरतीच्या काळात जुहू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. नदी-नाल्यांमधून समुद्रात पोहोचणारा हा कचरा पुन्हा किनाऱ्यावर येत असल्याने सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. तसेच हा कचरा हटविण्यासाठी महापालिकेलाही मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच नदी-नाल्यांमध्ये अडविणारी इंटरसेप्टर प्रणाली प्रभावी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.(Malad Creek Plastic Interceptor Project)
यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, "लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देणे किंवा उद्घाटने करणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष कामांची पाहणी करून त्याची गुणवत्ता तपासणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मालाड घडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू."(Malad Creek Plastic Interceptor Project)
मुंबईकरांना आवाहन करताना त्यांनी नदी, नाले किंवा समुद्रात कचरा टाकू नये, ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी तसेच स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.(Malad Creek Plastic Interceptor Project)