कल्याण :(Samrat Ashok Vidyalaya Shikshanachi Wari) सम्राट अशोक विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानात गोल रिंगण करून 'अभ्यास करूया घरी' संदेश देत विठू नामाच्या गजराने सारा परिसर दुमदुमला.(Samrat Ashok Vidyalaya Shikshanachi Wari)
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो. आषाढी एकादशीचे औचित्य साधत शाळेच्या मैदानावर बाल वारकरीच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करत नाचत गात भक्तीमय सोहळा पार पाडला.(Samrat Ashok Vidyalaya Shikshanachi Wari)
शिक्षणाची वारी पांडुरंग आपल्या दारी अभ्यास करूया घरी असे घोषवाक्य देत टाळ मृदुंगाच्या गजरात परिसरातून दिंडी काढण्यात आली. संतांच्या भूमिकेत आलेले विद्यार्थी संभव राठोड( विठ्ठल) तिथी केळबेकर( रुक्मिणी) संस्कृती जाधव (मुक्ताई) अर्णव मडके, रिद्रिक पाटील आणि प्रिन्स बनसोडे हे विद्यार्थी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. शाळेच्या सहशिक्षिका संगीता सतीश पाटील मुक्ताईच्या भूमिकेत होत्या. त्यांच्यासह इतर शिक्षकांनीही भक्तीमय सोहळ्यात सहभाग घेतला.(Samrat Ashok Vidyalaya Shikshanachi Wari)