हीच ती वेळ, देश नहीं झुकने देंगे!

    25-Jul-2026   
CJP Protest
 
गेले अनेक दिवस दिल्लीमध्ये आणि जिथे भाजपविरोधी पक्षाचे आमदार-खासदार आहेत, तिथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नावाने आंदोलन सुरू आहे. अश्लील बॅनरबाजी करत हिंसेचा उन्मादच इथे दिसून आला. अगदी संसद उखाडण्यापासून ते लोकांचे जीव घेण्यापर्यंतच्या धमक्याही दिल्या गेल्या. हे सगळे का? कशासाठी? मुंबईच्या वस्तीपातळीवर याचा मागोवा घेतला, तेव्हा जे सत्य दिसले, ते या लेखात शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
तुझ्या शोहरने तुला मारून घराबाहेर हाकलवले होते. त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. दोन दिवसांनी बोलावले आहे तेव्हा जाऊ.” तेव्हा समोरची खातून म्हणाली, "नहीं नहीं, दो दिन बाद मैं यहा नहीं रहुंगी और शोहर भी नहीं रहेगा. बस्ती के हमारे कौमवाले, हम सब बस भर के दिल्ली जा रहे हैं.” दिल्लीला देशी-विदेशी खाना फ्रीमध्ये मिळणार, तिथे गेल्यावर सगळी व्यवस्था होणार, तसेच टीव्ही चॅनेलवर दिसणार, मजाच मजा; असे इथल्या लोकांचे म्हणणे! काही लोकांचे म्हणणे आहे की, बरे झाले काफीर लोकांची सत्ता जाणार. दिल्लीला जाऊन हंगामा केला, तर कौमच काम आहे, बाबरीचा बदला आहे, असेही काहींचे म्हणणे. मुंबईमध्ये भेंडीबाजार, चांदिवली, मालवणी, गोवंडी, कुर्ला, साकीनाका आणि घाटकोपर, विक्रोळीतल्या वस्त्यांमधून बस भरभरून लोकांना असेच नेले जात आहे. यात केवळ मुस्लीमच नाहीत, तर फुकट मजा करायला मिळते ना, म्हणून जाणारे गैरमुस्लीमही आहेत बरं का! ‘झुरळ’ आंदोलनाची दिशा आधीच स्पष्ट झाली होती. पण, लोकांशी बोलताना विद्वेषाचे विष त्यांनी किती खोलवर पेरले आहे, हे कळले. या आंदोलनाला समर्थन करणारे राजकीय नेते आहेत, हे स्पष्टच. राजकीय स्वार्थासाठी राहुल गांधी ते अरविंद केजरीवाल ते उद्धव ठाकरे ते राज ठाकरे या आंदोलनाचे आयते कर्तेधर्तेही झाले.
 
मग ‘झुरळ’समर्थक लोकांना हे माहिती नसेल का? तर याचे उत्तर आहे, या आंदोलनातील ५० टक्के सहभागी हे भाजपच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, तसेच त्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे कायकर्ते आहेत. त्यातही अर्धे तर फ्रीमध्ये खायला-प्यायला आणि हुल्लडबाजी करायला मिळते म्हणून सहभागी आहेत. काहींना नेता बनायचे आहे. त्यांना आता या विघातक मंचावर विद्वेष फुलवण्याची संधी मिळत आहे. तुरळक काही लोक आहेत, ज्यांना आयुष्यात काहीच जमले नाही. त्यामुळे मनात नैराश्याचा राग आहे. तो कुठे काढणार, तर या असल्या आंदोलनात! ते समाजात कुणीही उघडपणे उच्चारू शकणार नाही, असे आक्षेपार्ह शब्द-वाक्य लिहिलेले बॅनर घेऊन न जाणे कोणत्या नशेत वावरणारेही तिथे आहेत! आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरूणाईही रस्त्यावर उतरलेली दिसते. अर्थात, ते तरूण आहेत आणि उत्साह, उत्सुकता हा त्यांच्या वयाचा भाग. त्यामुळे नवे काही घडत असेल तर तरूण त्यात सहभागी होतातच. जोपर्यंत काय खरं? काय खोटं? काय चांगलं? काय वाईट? हे त्यांना कळत नाही, तोपर्यंत ते या आंदोलनात राहणारच!
 
असो. या आंदोलनाच्या समर्थकांशीही मुद्दाम चर्चा केली. त्यांच्या भावना भडकावल्या होत्या, हे त्यांच्याशी बोलताना अगदी स्पष्ट जाणवत होते. समाजमाध्यमांतून त्यांच्यापर्यंत दर सेकंदाला आंदोलकांवरील अत्याचाराचे, लाठीहल्ल्याचे रील्स आदळत होते. त्यातच ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे २० मुलांना प्राण गमवावे लागले. सरकारनेच त्यांचा खून केला, पेपर फोडून श्रीमंतांची मुले मोठी होतात आणि गरीब पेपर विकत घेऊ शकत नाही म्हणून गरीबच राहतात. ‘कॉकरोच पार्टी’ जे आंदोलन करते, ते गरिबांसाठी-मागासवर्गीयांसाठी करते. त्यांचे आंदोलन यशस्वी झाले, तर शिक्षणव्यवस्था बदलेल; सगळी शिक्षण फ्री होईल. डॉक्टर-इंजिनिअर वगैरे सहज होता येईल. कशाला पाहिजे, ‘नीट’ची परीक्षा?’ अशा धादांत तर्कहीन रील्सने सध्या धुमाकूळ घातला आहे. तसेच अनेक रील्स अशा होत्या, ज्यात गरीब-मागासवर्गीय समाजाची मुले तिथे एक महिना उपोषणात मरत आहेत; पण कुणीच त्यांना विचारत नाही. गरिबांच्या पोरांचा वाली कोण? काही रील्स अशा, ज्यात सिनेस्टार कलाकार उपोषणाबद्दल बोलतात. ते एवढे नामांकित असून, उपोषणाबद्दल बोलतात, आंदोलनाबद्दल बोलतात, म्हणजे ते खरेच आहे असे भासवणार्‍या रील्स; काही रील्समध्ये पंतप्रधान मोदींनी जे केले नाही, त्यावर रडतरडत बोलणारी तरुणी किंवा तरुण. बरे, हे सगळे बोलतात ते महापुरुषांना अभिवादन करून. देशातील मागासवर्गीय समाज आणि अल्पसंख्याक समाजाला चिथावणी देणारे हे रील्स सगळेच खोटे. पण, सोशल मीडियावर या रील्सचा अक्षरश: रतीब. या रील्स घरातल्या गृहिणी, बालक आणि तरुणी असे सगळेच पाहत आहेत. त्यांच्यापर्यंत सत्य काय आहे, हे पोहोचत नाही. कारण, झुरळांनी बर्‍यापैकी सोशल मीडिया कब्जात घेतला आहे.
 
दुसरे असे की, प्रसारमाध्यमांतील काही घटकांची भूमिकाही संशयास्पदच. या आंदोलनात नक्षली आणि खलिस्तानी समर्थक घुसले हे सांगायला त्यांची लेखणी धजावत नाही की, कॅमेरा पुढे सरसावत नाही. उलट, या आंदोलनात काही ठरावीक लोक (जे पूर्वीपासून मोदीविरोधक आहेत) त्यांची मते सातत्याने लोकांसमोर प्रसारित करत आहेत.
 
कालचीच गोष्ट- मुंबईमध्ये पोलिसांची गाडी एका महिलेने अडवली. तर, तरुणी कशा सरकारच्या विरोधात आहेत हे सांगायला अनेक माध्यमे पुढे सरसावली. निडर तरुणीपुढे पोलीस झुकले, असेही त्यांनी लिहिले. खरेतर भररस्त्यात, भरगर्दीत ती तरुणीच नव्हे, तर कुणीही व्यक्ती गाडीपुढे आली असती; तरी पोलिसांनी गाडी थांबवलीच असती. पण, अनेक माध्यमांनी पोलिसांच्या संवेदनशीलतेचे समर्थन केले नाही, तर त्या महिलेने गाडी कशी अडवली, त्याचे कोडकौतुक केले. दुसरीकडे ठाण्यात विद्यार्थ्यांच्या नावाने चाळीशीच्या पुढचे दहा-पंधरा लोक ‘झुरळ पार्टी’च्या समर्थनार्थ आंदोलन करत होते. ‘पोलीस प्रशासन अत्याचार करते, आता आपण त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू,’ असे तिथे म्हटले जात होते. पोलिसांबाबत अशी चिथावणीची भाषा ऐकून सुनैना देवरे या तरुणीने प्रश्न विचारला की, "हे आंदोलन कशासाठी? दिल्लीत पोलिसांना-सैनिकांना मारहाण झाली, त्याचे काय करायचे? पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्याविरोधात का बोलता? शिक्षणाच्या नावाने हे काय सुरू आहे.” तर, उपस्थित त्या हुल्लडबाज चिथावणीखोर लोकांनी ‘गोदी मीडिया’ म्हणत आरडाओरड करायला सुरुवात केली. ती म्हणाली, "मी गोदी मीडिया कशी असेन? मी कोणत्याच पक्षाची साधी कार्यकर्ता नाही. मी स्वतः चर्मकार समाजाची आहे. मला सांगा, इथे कोण विद्यार्थी आहेत?” यावर तिथल्या काही पुरुष-महिलांनी तिला धक्काबुक्की केली. आता या घटनेत स्पष्ट दिसत होते की, समाजाचा भाग असलेल्या तरुणीने ‘झुरळ’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे तिला धक्काबुक्की झाली. मात्र, प्रसारमाध्यमांनी काय पोस्ट केले तर, ‘आंदोलनाला विरोध करणार्‍या तरुणीवर जनतेचा संताप!’ काय म्हणावे? पोलीस आणि प्रशासनाविरोधात चिथावणी देणारे ते दहा-पंधरा लोक म्हणजे काय देशाची पूर्ण जनता का? पण, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर असे चित्र रंगवले जात आहे की, देशातला एकूण एक व्यक्ती मोदींच्या विरोधात आहे, भाजपच्या विरोधात आहे आणि सगळेजण ‘कॉकरोच’ आंदोलनामध्ये सहभागी आहेत. प्रत्यक्षात काय आहे? जिथे भाजपचे किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे आमदार-खासदार नाहीत, तिथे ‘कॉकरोच पार्टी’चे आंदोलन जोरात सुरू आहे. त्या आंदोलनात नेहमीच्या ‘डफलीवाली गँग’सह सत्ता आम्हालाच पाहिजे; पण ती मिळाली नाही म्हणून चरफडणार्‍या पक्षाचे नेते आणि त्यांनी आमिष देऊन आणलेले कार्यकर्ते आहेत, त्यापलीकडे जाऊन कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली तरूणाईही आहे. कारण, आधीच सांगितल्याप्रमाणे जिथे उत्साह आणि काहीतरी नवीन घडते, तिथे समाजातला एक तरूण वर्ग वळतोच वळतो. काही भोळे लोकही या आंदोलनात सहभागी होत आहेत. या लोकांना सांगितले गेले आहे की, सध्याचे सरकार बदलले, तर तुमचे आणि तुमच्या लेकराबाळांचे कल्याण होईल!
 
या परिप्रेक्ष्यात मोदी, शाह आणि राज्यात फडणवीस काय करायचे ते करतीलच. अनेकांचे म्हणणे आहे, सत्तेत भाजप आहे. त्यांचे कार्यकर्ते काय करतात? अर्थात, त्यांना काय करायचे आहे ते करतही असतील. पण, सत्य-न्यायाचे समर्थन करण्याची ताकद सज्जनशक्तीनेही दाखवायलाच हवी. ‘देश नहीं मिटने देंगे’ अशी जर भावना आहे, तर वस्तीपातळीवर ‘नीट’ आणि शिक्षणाच्या नावाने समाजाला जी चिथावणी दिली जात आहे, भ्रमित केले जात आहे, त्याविरोधात सत्य काय आहे, याची जागृती करायलाच हवी. संविधानाच्या नावाने नेमके संविधानाच्या विरोधात जात संसद उखडून फेकणार्‍यांचे खरे चेहरे समाजापुढे कोण आणणार? समाजात ‘झुरळां’च्या आड पुन्हा फुटीरतावाद पोसला जाऊ नये, या असल्या आंदोलनात समाजाची तरूण मुलं-मुली फसून अडकू नयेत, म्हणून सज्जनशक्तीने आता पुढे यायलाच हवे. तसेच प्रशासन आणि कायदा जनतेच्या देशाच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी आहे आणि देशाला वेठीस धरणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे प्रशासनाने, सरकारने ठोसपणे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. कारण, ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो आहे.’ त्यामुळे सरकार प्रशासन आणि देशातल्या सज्जनशक्तीने या झुरळ आंदोलनाची दिशा आणि दशा ओळखत एकजुटीने काम केले पाहिजे, हीच ती वेळ!

९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर