ठाण्यात झुरळ समर्थक आंदोलनाला त्या तरूणीची चपराक; सज्जनशक्तीकडून सुनिता देवरेंचे कौतुक

    24-Jul-2026   
 
 
Sunita Devre Thane Protest
 
ठाणे (Sunita Devre Thane Protest) : पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात. त्यांच्या विरोधात कशाला बोलता? इथेसुद्धा काही झाले तर पोलीसच आपले रक्षण करणार. शिक्षणासाठी आंदोलन करता मग इथे पोलीसांच्या विरोधात का बोलता? विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आंदोलन करता पण इथे किती विद्यार्थी आहेत ते सांगा? असा प्रश्न सुनिता देवरे या तरूणीने ठाण्यातल्या कॉकरोज जनता पार्टी समर्थकांच्या आंदोलनात विचारला. तीच्या प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विद्यार्थ्यांच्या नावाखाली पोलीस आणि प्रशासनाविरोधात जनतेला चिथावणी देणार्‍या त्या आंदोलनाला सुनिता देवरे हिने चपराक दिली. त्यामुळे सज्जनशक्तीकडून तीचे कौतुक होत आहे. (Sunita Devre Thane Protest)
 
सुनिता देवरे यांच्याशी दै मुंबई तरूण भारतने संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की २३ जुलै रोजी ठाण्यामध्ये कॉकरोच पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू होते. १५ ते २० लोक होते. आंदोलन नक्की काय आहे हे पाहण्यासाठी थांबले. पोलीस आणि प्रशासन आपल्यावर अत्याचार करते, त्याच्याविरोधात आता आपण रस्त्यावर उतरायलाच हवे अशी भाषण तीथले लोक करत होते. विद्यार्थ्यांच्या नावाखाली ते लोकांना पोलीस आणि सरकारच विरोधात भडकावत होते.मी त्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी गोदी मिडीया म्हणत मला धक्काबुक्की केली. मी त्यांना सांगितले की मी मिडीयामध्ये नाही. मी स्वतः मागासवर्गिय समाजाची आहे. सुनिता देवरे यांच्या विधानानंतरही त्यांना तीथे धक्काबुक्की करण्यात आली. मात्र सुनिता ठाम राहिल्या. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर वेगाने प्रसारीत झाला. सुनिता देवरे या तरूणीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Sunita Devre Thane Protest)
 
त्या ताईच्या भूमिकेचे स्वागतच
 
"अभिजीत दिपके ने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले म्हणून सगळा समाज कॉकरोच आंदोलनात समर्थन करेल असे नाही. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याच्या पाठी उभे राहायला शिकवले ,त्यामुळे सुनिता देवरे या ताईने घेतलेल्या भूमिकेचे डॉ बाबासाहेबांना माननार्‍या सर्व समाजाने स्वागत करायला हवे" - स्वप्नील घायतडके,आंबेडकरी विचारांचा तरूण (Sunita Devre Thane Protest)
 
असल्या विघतक आंदोलनाचा निषेध आणि विरोधच!
 
कॉकरोच पार्टी शिक्षणासाठी आंदोलन करते मग कालच्या त्या ठाण्याच्या आंदोलनात पोलीस आणि प्रशासनाबाबत चिथावणी दिली जात होती हे भयंकर आहे. तसेच मागासवर्गिय समाजाच्या तरूणीला धक्काबुक्की करणारे हे काय समाजाच्या भल्यासाठी आंदोलन करत आहेत का? मी या घटनेचा आणि त्या अनुषंगाने त्या झुरळ आंदोलनाचा निषेध करतो. (Sunita Devre Thane Protest)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर