बेकायदेशीर जमावात किंवा आंदोलनात सहभागी होऊ नका: जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आवाहन

 
JNU Delhi University Advisory
 
मुंबई,(JNU Delhi University Advisory):दिल्लीतील जंतरमंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सल्लापत्रे (अॅडव्हायजरी) जारी केली आहेत. दोन्ही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जंतरमंतर परिसरातील आंदोलनांपासून दूर राहण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.(JNU Delhi University Advisory)
 
जेएनयू प्रशासनाने जारी केलेल्या सल्लापत्रात सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक आंदोलनांबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार, जंतरमंतर आणि परिसरात आयोजित आंदोलनांमध्ये सहभागी होणे किंवा तेथे जाणे टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करण्याचा सल्ला देत, नियमांचे उल्लंघन झाल्यास लागू कायद्यांनुसार कारवाईसह विद्यापीठाच्या आचारसंहितेनुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक जबाबदारी तसेच जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये जपावीत, असेही जेएनयूने नमूद केले आहे.(JNU Delhi University Advisory)
 
दरम्यान, दिल्ली विद्यापीठानेही विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी जारी केलेल्या सल्लापत्रात "तुमची सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे," असे नमूद करत जंतरमंतरवरील कोणत्याही बेकायदेशीर जमावात किंवा आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा आंदोलनांवर कडक नियम लागू असून, त्यात सहभागी झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.(JNU Delhi University Advisory)
 
विद्यापीठ प्रशासनाने पुढे म्हटले आहे की, अशा आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यातील व्यावसायिक संधींवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(JNU Delhi University Advisory)
 
दोन्ही विद्यापीठांनी सोशल मीडियावरील अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या परिस्थितीला चिथावणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याने कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(JNU Delhi University Advisory)
 
दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शैक्षणिक वातावरण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने दोन्ही विद्यापीठांनी ही सल्लापत्रे जारी केली असून, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(JNU Delhi University Advisory)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर