झाडाची फांदी पत्र्याच्या हॉटेलवर कोसळली;लोखंडी चॅनलमुळे मोठी हानी टळली

    24-Jul-2026   
 
 
Dombivli Tree Branch Incident
 
डोंबिवली,(Dombivli Tree Branch Incident):ठाकुर्ली नजीकच्या कचोरे प्रभागातील शिवमंदिर येथील पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळुन हाॅटेलवर पडल्याची घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. हॉटेलच्या लोखंडी चॅनलवर ही फांदी अडकल्याने जिवीतहानी टळली.(Dombivli Tree Branch Incident)
 
ही घटना घडली त्यावेळी हॉटेल बंद करण्याची लगबग सुरू होती. घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले या घटनास्थळी पोहोचल्या. तातडीने अग्निशमन विभागाला देखील याची माहिती देण्यात आली. तसेच वीजेच्या तारांवर देखील फांदया पडल्याने महावितरणच्या कर्मचा-यांना देखील बोलाविले गेले होते. दरम्यान या परिसरात आणखीन दोन ते तीन झाडे धोकादायक असून तातडीने तोडण्यात यावीत अशी मागणी स्थानिक रहिवाशी संजीव चौधरी यांनी केली आहे.(Dombivli Tree Branch Incident)
 
 




संबंधित मजकूर