धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाला मंजुरी

२४० किमी मार्गाचा डीपीआर तयार होणार; रेल्वे मंत्रालयाची लोकसभेत माहिती

Marathwada Railway
 
मुंबई : (Marathwada Railway) मराठवाड्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या २४० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.
 
लोकसभेत लेखी उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, डीपीआर तयार झाल्यानंतर या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारसह विविध संबंधित यंत्रणांशी चर्चा केली जाईल. तसेच नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि इतर सक्षम प्राधिकरणांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळेल. (Marathwada Railway)
 
रेल्वे मंत्रालयाच्या मते, नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. मात्र, प्रत्येक प्रकल्पाचा कालावधी हा डीपीआर, तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता, तसेच विविध विभागांकडून मिळणाऱ्या मंजुरींवर अवलंबून असतो. (Marathwada Railway)
 
धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना थेट रेल्वेने जोडणारा हा प्रस्तावित मार्ग मराठवाड्यातील प्रवासी वाहतूक, उद्योग, शेती आणि व्यापाराला मोठी चालना देणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या भागातील रेल्वे संपर्कात महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता आहे. (Marathwada Railway)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर