भाजपवाले म्हणत होते बघा, राहुल गांधी कुठे आहेत, दिसत नाहीत. पण, मी आता आलो आहे. ‘माँ मैं आ गया, मै आ गया माँ’ हे वाक्य काय ‘कोई मिल गया’ चित्रपटातले आहे का? नाही, अरे हे वाक्य मी म्हटलंय. नुसताच आलो नाही, तर झुरळांच्या मिशा आपल्या ‘पंजा’त घेऊन आलो आहे माँ! त्याचं काय आहे ना, सतत हरत राहून सत्ता मिळेल, असे स्वप्न बघत मोदी आणि भाजपचा द्वेष करण्यासाठीच माझा जन्म झाला, हो ना ममा! पण, आता मला खूप स्पर्धक आहेत- सपा, ममता आंटी, ‘लाल सलाम’ आणि महाराष्ट्रातले आपले ते पवार अंकल, ते आजारी होते; पण तेपण झुरळ पार्टीकडे गेले. सेम टू सेम माझ्यासारखा वागणारा उबाठादादा आणि ती कोणतरी अंधारी नावाची आंटी, कुणाला तरी म्हणते की, ‘उठ दुपारी, घे सुपारी.’ तेपण मला ‘कॉम्पिटिटर’ आहेत ममा!
ममा, सत्तेत नसलेल्या सगळ्यांनी झुरळ पार्टीकडे हजेरी लावली. पण, मी आंदोलन केले तर लगेच आम आदमी पार्टीचा संजय सिंह म्हणतो की, "माझ्यामुळे झुरळ आंदोलन कमजोर झाले आणि आंदोलन कमजोर करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ‘धरणे’ला बसवले.” ममा, मोदींचे लक्ष वेधण्यासाठी मी शिव्याशाप देतो, काय काय करतो; तरीही ते मला भाव देत नाहीत. तर, ते आता झुरळांसाठी मला बोलावतील? ममा, लोक कशाने पण का होईना; पण ‘पप्पू’ बोलतात. पण, मला तर वाटत, माझ्यापेक्षा जास्त उच्च दर्जाचे ‘पप्पू’ आपल्यासोबतचे विपक्षी पक्ष आहेत. हे लोक किती अज्ञानी आहेत. मोदी सरकार जाण्यासाठी आणि भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी ‘सीएए’ म्हणू नको, शेतकरी आंदोलन म्हणू नको, हिंदू-मुस्लीम ते हिंदूंमधील जातींमध्ये भांडण लावणे असू दे, असे कमी का प्रयत्न झाले? पण, प्रत्येक वेळी जनतेला यातले ‘इंडिया बे्रकिंग’चे सत्य समजले आणि मोदी जिंकले. आता ‘सायकल’, ‘मशाल’, ‘तुतारी’, ‘इंजिन’ सगळेच झुरळांना वेलकम करत आहेत. पण, झुरळ काय ‘आप’च्या झाडूखाली राहूनच ‘लाल सलाम’ करतील? नाही, आपल्या ‘पंजा’खाली झुरळांना घेऊ! पण, भारताची सज्जनशक्ती देशाच्या सुरक्षिततेसाठी झुरळांना धडा शिकवेल, तेव्हा आपला ‘पंजा’ मोडणार नाही ना? नाहीतर झुरळ पळतील आणि आपला पंजा? भीती वाटते. पण, आपण दिसायला हवे. त्यामुळेच, ‘झुरळ इज हायजॅक बाय पंजा’ हेच बरोबर आहे ना?
‘आऊटडेटेड’ लोकांचे झुरळ!
झुरळ पार्टीच्या हिंसाचारात किती पोलीस, किती पत्रकार जखमी झाले याची गणती नाही. मात्र, नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी ते स्वरा भास्कर आणि आपल्या मराठीतलेही असेच छोटे-मोठे नाटकी लोक, ज्यांना आता सिनेमात-नाटकांत कामे मिळेनाशी झाली आहेत; त्यांनी झुरळ पार्टीच्या नावाने हिंसाचाराची तळी उचलली. नसिरुद्दीन शाह! या ढोंगी माणसाला या देशात राहण्याचीही भीती वाटते. तरीही, तो इथेच खातो, पितो आणि सगळ्या सुखसोई हडप करतो, वर या देशाच्या व्यवस्थेला नावहे ठेवतो. देशाच्या सत्ताधारी नेतृत्वाची नाव घ्यायची तरी याची लायकी आहे का? पण, आता त्याने तोंड उघडले. कारण, त्याच्या आणि त्याच्यासारख्याच देशाचा तिरस्कार करणार्या लोकांच्या तोंडी झुरळांनी हिंसा करून रक्तबंबाळ केलेल्या पोलिसांचे आणि पत्रकारांचे रक्त लागले आहे.स्वतःला कलाकार, साहित्यिक म्हणवणारे हे आऊटडेटेड लोक!
तसेही मोदीविरोधी, हिंदूविरोधी, देशविरोधी आंदोलनात कोण असते? डफली वाजवत हिंदूंना आणि उद्योगपतींना शिव्या देणारे बेकार लोक, ‘मेरा लिंग मेरी मर्जी’ म्हणत नैतिकता झुगारलेले आणि ‘हम देखेंगे, बस नाम रहेगा अल्ला का’ म्हणत धमकीवजा संदेश देणारे लोक. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संविधानाच्या विरोधातच वागतात. यांची संख्याही कमी असते; पण हिंसा करून ते देशाला वेठीस धरतात. तसेही झुरळ आंदोलनात कोण होते?‘फ* डेमोक्रसी’ असलेले बोर्ड झळकवणारे, मोदींना जीवे मारण्याची, संसद भवन उडवण्याच्या धमक्या देणारे, पत्रकारांचे-पोलिसाचे ‘मॉब लिचिंग’ करण्याचा प्रयत्न करणारे, हे सगळे भारतीयांचे शत्रू आहेत. नुकतेच बांगलादेशच्या ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटनेने या झुरळांना पाठिंबा दिला. त्यामुळेच ‘नीट’च्या नावाखाली देशविघातक कृत्याकडे वळलेल्या प्रत्येकाची कोणतीही दयामाया न दाखवता चौकशी झालीच पाहिजे, ही देशाच्या सज्जनशक्तीची सरकारकडे विनंती आहे. हे वास्तवात कठीण असेलही; पण अशी झुरळे जरा कमी पैदा व्हावी, यासाठी हे आवश्यक आहे. देशाच्या सार्वभौम सुरक्षेपेक्षा काहीच मोठे नाही. बाकी दीपकेसारखे लोक किती आले आणि किती गेले; पण देश कायम राहिला!
९५९४९६९६३८