विद्यार्थी संकुचित राजकीय स्वार्थ व राष्ट्रविरोधी कटकारस्थानांचे माध्यम बनणार नाहीत : अभाविप

स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता व संस्थात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी : अभाविप

    23-Jul-2026

ABVP Competitive Exam Reforms 
 
मुंबई, (ABVP Competitive Exam Reforms) अभाविप विद्यार्थ्यांना, युवकांना, पालकांना, शिक्षकांना, शिक्षणतज्ज्ञांना आणि समाजातील सर्व घटकांना आवाहन करते की, "विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना राजकीय दिशाभूल आणि भडकावण्यापासून दूर ठेवत त्यांच्या समाधानासाठी सकारात्मक, शांततापूर्ण आणि लोकशाहीवादी वातावरण निर्माण करण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी तसेच राष्ट्रविरोधी कटकारस्थानांना बळी पडू नये."(ABVP Competitive Exam Reforms)
 
" जंतर-मंतर येथे नीट-यूजीसह विविध शैक्षणिक प्रश्नांवर आयोजित आंदोलनादरम्यान निर्माण झालेली अराजकता, स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेणाऱ्या काही अराजक प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि सुरक्षा दलांमध्ये झालेला हिंसक संघर्ष तसेच राजधानी दिल्लीतील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अत्यंत दुर्दैवी मानते.विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाच्या आड काही राजकीय स्वार्थी आणि समाजविघातक घटकांनी हिंसा व अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला असून, अभाविप त्याचा तीव्र निषेध करते. या घटनांमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांप्रती आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारच्या संघर्षांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचे निराकरण केवळ अर्थपूर्ण संवाद, संवेदनशीलता आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातूनच होऊ शकते." असे अभाविपचे मत आहे.(ABVP Competitive Exam Reforms)
 
अभाविप स्पष्ट करू इच्छिते की," नीट-यूजीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेविरुद्ध ती सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अभाविपने सर्वप्रथम केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली होती. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या मुख्यालयी आंदोलन करून उत्तरदायित्व निश्चित करण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली होती. सन २०२४ पासून आजपर्यंत अभाविप नीट-यूजी विषयावर विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. त्यामुळे अभाविप केंद्र सरकारकडे मागणी करते की, स्पर्धा परीक्षांची शुचिता, पारदर्शकता आणि आवश्यक संस्थात्मक सुधारणांच्या विविध पैलूंचा सखोल आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. ही समिती परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि उत्तरदायी करण्यासाठी ठोस व कालबद्ध शिफारसी सादर करेल.(ABVP Competitive Exam Reforms)
 
अभाविपचे मत आहे की," विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक समस्या आणि न्याय्य मागण्यांचा वापर संकुचित राजकीय स्वार्थ, राष्ट्रविरोधी अजेंडा किंवा देशात अस्थिरता, संघर्ष आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी होऊ नये. अशा प्रकारचे प्रयत्न 'डीप स्टेट'सारख्या भारतविरोधी यंत्रणांना बळ देतात, ज्या दीर्घकाळापासून भारताची अंतर्गत स्थिरता, अखंडता, सार्वभौमत्व आणि एकता कमकुवत करण्याचा तसेच सामाजिक वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील विद्यार्थी समाज जागरूक, राष्ट्रनिष्ठ आणि लोकशाही मूल्यांप्रती कटिबद्ध असून, तो कोणत्याही राजकीय दिशाभूल, बाह्य प्रभाव किंवा राष्ट्रविरोधी कटकारस्थानांचे माध्यम बनणार नाही.(ABVP Competitive Exam Reforms)
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी म्हणाले, "नीट-यूजीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. या न्याय्य प्रश्नांवर अभाविप सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांसोबत उभी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना संकुचित राजकीय स्वार्थांकडे वळविण्याचा प्रत्येक प्रयत्न हा विद्यार्थी हितावरील अन्याय आहे. विद्यार्थीशक्तीचा वापर कोणत्याही राजकीय अजेंड्यासाठी किंवा भारताची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा यांच्याविरुद्ध कार्य करणाऱ्या शक्तींच्या हितसाधनासाठी होऊ दिला जाणार नाही. अशा प्रकारचे प्रयत्न 'डीप स्टेट'सारख्या भारतविरोधी यंत्रणांना अप्रत्यक्षपणे बळ देतात, ज्या दीर्घकाळापासून भारताची अंतर्गत स्थिरता आणि सार्वभौमत्व कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचे निराकरण केवळ अर्थपूर्ण संवाद, संवेदनशीलता आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातूनच होऊ शकते. अभाविप केंद्र सरकारकडे मागणी करते की, स्पर्धा परीक्षांची शुचिता, पारदर्शकता आणि आवश्यक संस्थात्मक सुधारणांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, ज्यामुळे परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि उत्तरदायी बनविता येईल.(ABVP Competitive Exam Reforms)
 
 




संबंधित मजकूर