शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

    22-Jul-2026   

Sharad Pawar Supriya Sule Meet Prime Minister Narendra Modi

 

मुंबई : (Sharad Pawar Supriya Sule Meet Prime Minister Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा जेष्ठ नेते खा. शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, दिल्लीत सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते. (Sharad Pawar Supriya Sule Meet Prime Minister Narendra Modi)

नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. यानिमित्ताने मंगळवारी शरद पवार यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली होती. यावेळी त्यांनी कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, बुधवारी सकाळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. संसदेतील मोदींच्या कक्षात ही भेट झाली आहे. (Sharad Pawar Supriya Sule Meet Prime Minister Narendra Modi)

पंतप्रधानांकडून पवारांचे आपुलकीने स्वागत

 

पंतप्रधान कार्यालयाने मोदी आणि पवार यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या हाताला धरून आपुलकीने स्वागत करताना दिसतात. यावेळी शरद पवारांनी त्यांना एक निवेदन दिले आहे. मात्र, या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. (Sharad Pawar Supriya Sule Meet Prime Minister Narendra Modi)
 
 

 





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर