नवी दिल्ली : (NEET Protest ) राहुल गांधी आणि देशातील अन्य विरोधी पक्ष अभिजीत दिपकेंचं आंदोलनं हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा आरोप आम्ही नव्हे तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केलायं. राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे आणि आता मनोज जरांगेसुद्धा जंतर मंतर वरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या या नेत्यांच्या भाऊगर्दीत नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा कुठे हरवत चालला आहे का? जाणून घेऊयात…
राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानी दिवसभर आंदोलन केले. पोलीसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोन्ही खासदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यामुळे दिवसभर सुरू असलेले आंदोलनाच्या बातम्यांकडे काहीकाळ प्रमुख माध्यमे आणि सोशल मीडियाचे दुर्लक्ष झाले. राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आल्याच्यानंतर हीच बातमी सगळीकडे झळकू लागली. दिपके आणि त्यांच्या आंदोलकांना काहीकाळ का होईना साईडलाईन झाल्यासारखे वाटू लागले होते.(NEET Protest)
ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आप खासदार संजय सिंह यांनी काँग्रेसींना इशारा दिला. देशातील करोडो युवकांसाठी सोनम वांगचुकजी गेले २३ दिवस आमरण उपोषण करत आहेत. जंतरमंतरवर देशातील युवा आंदोलन करत आहे. २० जुलैला युवकांना मारहाण करण्यात आली. काँग्रेस एक महिन्यापासून आंदोलनास शिव्या देत आहे. आता राहुल गांधी म्हणत आहेत की “जंतर मंतर वर न्हवे आमच्या धरणे आंदोलनात सामील व्हा. युवांच्या आंदोलनास कमजोर का करत आहे काँग्रेस? जंतर मंतर वरील आंदोलनात सामील व्हा असे आवाहन काँग्रेस का करत नाही आहे काँग्रेस?" आजवर विद्यार्थीकेंद्री म्हणणाऱ्या या आंदोलनास आता मात्र उघड उघड राजकीय वळण लागले आहे. यातील श्रेयवाद किती पुढे गेला आहे हे दिसून येत आहे.(NEET Protest)
आपल्यालाच देशातील युवकांच्या भवितव्याची काळजी आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आता विरोधी पक्षाकडून केला जात आहे.यात आता मुख्य मुद्दा सोडून श्रेयववाद घेण्याचा प्रयत्न आप, काँग्रेस, सपा, उबाठा,तृणमूल यासारख्या पक्षांकडून केला जात आहे. कारण मंगळवार दि.२१ रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली खासदारांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडक देत तिथे धरणे आंदोलन केले.जर राहुल गांधी यांना आंदोलनच करायचे होते तर जंतर मंतर वर का केले नाही असे प्रश्न आता आम आदमी पक्षाचे नेते लागले आहेत."नीट परीक्षा आणि त्यासंदर्भातील मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे असे केंद्र सरकारने स्पष्ट केलं असताना राहुल गांधी यांनी मात्र चर्चेचा मुद्द्यावरून घुमजाव करून धरणे आंदोलन करीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.(NEET Protest)
याचा अर्थ अभिजीत दिपकेंची भेटही घेण्यास कमीपणा राहुल गांधींना वाटला का? खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंनी देखील काल जंतरमंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली. मग राहुल गांधी अभिजीत दिपकेंना का भेटले नाहीत? काँग्रेसच्या नेत्यांनाही जंतरमंतरचा रस्ता धरावा, असे वाटले नाही.(NEET Protest )
दिपकेंच्या २० जुलैच्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले असते तर एक वेगळा संदेश विद्यार्थ्यांना केला असता. मात्र, राहुल गांधी दिवसभर दडी मारून बसले आणि रात्री उशीरा आमचा विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, असे सांगत आंदोलकांना पाठिंबा दिला. मात्र, अभिजीत दिपकेचा उल्लेख करणेही राहुल गांधींनी टाळले. स्वतः वय वर्ष 56 असताना राहुल गांधी स्वतःला युवकांचा नेता म्हणवतात. मात्र, वेळप्रसंगी जेव्हा विद्यार्थी लाठ्याकाठ्या खात होते. आंदोलनात अराजकतावादी घुसले होते. त्यावेळी कुठलीच भूमिका पक्षाने न घेता लांबून मजा पाहण्यात राहुल गांधी आणि काँग्रेसची नेते मंडळवी व्यस्त होती. एकूणच काय पोलीसांचा मार हा ना दिपकेंनी खाल्ला, वांगचूक रुग्णालयात दाखल होते, तर त्यांचे बडतर्फ करण्यात आलेले प्रवक्ते विजेता दहीया बर्गर खात बसले होते. उद्धव ठाकरेंनी रात्री उशीरा जंतरमंतरवर पोहोचले. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा किंवा नीट परीक्षेचा एकही मुद्दा उपस्थित केला नाही.(NEET Protest)
याउलट या आंदोलनात स्वतःच्या पक्षाची पोळी भाजून घेण्यात धन्यता त्यांनी मांडली. हे सरकारच उघडून फेकून टाका, तोपर्यंत आपले आयुष्य बदलणार नाही, असे ठाकरे म्हणाले. अर्थात सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंचे आयुष्य बदलणार नाही, हेही तितकेच खरे. हे सगळे सुरू असताना ममता बॅनर्जी स्वस्त बसतील का? त्यांनाही पुन्हा आपल्या पराभूत झालेल्या मित्रपक्षांची आठवण झाली. इंडी आघाडीने एकत्र यावे, अशी साद त्यांनी घातली. आपण एकत्र येऊ आणि भाजपला नामोहरम करू, असे आवाहन त्यांनी पक्षांना केले. अर्थात राहुल गांधींसह कुठल्या पक्षांनी त्यांना किती गांभीर्याने घेतले? हाही वादाचा मुद्दा. राज ठाकरेही आपल्या सोशल मीडियाद्वारे या सरकारवर आसूड ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आपण स्वतः जंतरमंतरवर जाणार का? याबद्दल त्यांनी कळवलेले नाही.(NEET Protest )
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने भारत बंदची हाक आहे. मात्र, त्याला किती यश मिळेल हाही प्रश्नच आहे. एकूणच सर्वच विरोधी राजकीय पक्षानी आपला भाजप विरोध हा मुद्दा प्रमुख बनवला असून विद्यार्थी केंद्रित आंदोलन आता राजकीय स्वार्थ केंद्रित झालेले दिसत आहे. आत्तापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारे आंदोलक आता थेट पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहेत यावरून राजकीयदृष्ट्या प्रेरित उद्देश घेऊनच या आंदोलनाची वाटचाल सुरू आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आंदोलकांनी विरोधी पक्षांच्या दावणीला बांधले जाऊ नये याची काळजी घ्यायची गरज आहे.(NEET Protest)