मुंबई : (National Financial Literacy Quiz 2026) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) सहकार्याने नॅशनल फायनान्शियल लिटरसी क्विझ (एनएफएलक्यू) 2026चा यशस्वीपणे प्रारंभ केला. या प्रश्नमंजूषेचा पहिला रिजनल राउंड मुंबईतील के. सी. कॉलेजमध्ये (एचएसएनसी युनिव्हर्सिटी) आयोजित करण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमात पश्चिम विभागातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि दादरा व नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश) येथील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तरुण विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी देशात राबविण्यात येत असलेल्या सर्वांत मोठ्या उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रश्नमंजूषेची सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली.
महाविद्यालयीन आणि ऑनलाइन पात्रता फेरीत देशभरातील 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला. या फेरीतील कामगिरीच्या आधारे आघाडीच्या संघांची रिजनल राउंड्ससाठी निवड करण्यात आली आहे. या फेऱ्या भारतातील पूर्व, दक्षिण, उत्तर, मध्य, पश्चिम आणि ईशान्य विभागांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत.(National Financial Literacy Quiz 2026)
सहभागींना संबोधित करताना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सचे (एनआयएसएम) संचालक श्री सशी कृष्णन म्हणाले, ‘आर्थिक साक्षरता हे जीवनातील अत्यावश्यक कौशल्य आहे. त्यामुळे तरुणांना आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेता येतात. नॅशनल फायनान्शियल लिटरसी क्विझच्या माध्यमातून आर्थिक बाजारपेठा, गुंतवणूकदारांचे हक्क आणि सुयोग्य आर्थिक पद्धती यांविषयीची जागरूकता रंजक पद्धतीने अधिक दृढ करण्याचे एनआयएसएमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तरुण भारतीयांमध्ये आर्थिक क्षमता विकसित करण्याविषयी वाढत असलेली उत्सुकता दर्शवतो. माहितीपूर्ण आणि जबाबदार भावी गुंतवणूकदार घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’(National Financial Literacy Quiz 2026)
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) महाव्यवस्थापक श्री विकास एस. एस. म्हणाले, ‘माहितीपूर्ण गुंतवणूकदार हा सक्षम आणि विश्वासार्ह रोखे बाजाराचा पाया असतो. राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजूषेसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुंतवणुकीची तत्त्वे, बाजाराचे नियमन आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण यांविषयी लहान वयातच माहिती मिळते. आर्थिक जागरूकतेला चालना देण्यासाठी आणि भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक परिसंस्थेत तरुणांनी जबाबदारीने सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देण्यास सेबी कटिबद्ध आहे.’(National Financial Literacy Quiz 2026)
सर्जनशील डिजिटल कथाकथनाच्या माध्यमातून आर्थिक जागरूकतेला आणखी चालना देण्यासाठी या कार्यक्रमात एनआयएसएमतर्फे देशव्यापी 'एनआयएसएम रील स्पर्धे'ची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत स्मार्ट गुंतवणूक, गुंतवणूकदारांसाठी अनुकूल नियम, आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यांविषयी जागरूकता, सुरक्षित गुंतवणुकीच्या पद्धती आणि आर्थिक साक्षरता अशा विषयांवर आकर्षक रील तयार करण्यासाठी विद्यार्थी, कंटेन्ट क्रिएटर, तरुण व्यावसायिक आणि आर्थिक साक्षरतेविषयी उत्सुक असलेल्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.(National Financial Literacy Quiz 2026)
स्पर्धकांना कोणत्याही भाषेत 50 ते 120 सेकंदांच्या स्वतः तयार केलेल्या रील सादर करता येतील. रीलसाठी इंग्रजी सबटायटल देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आर्थिक संकल्पना अधिकाधिक लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी रोल प्ले, कथाकथन आणि लघुनाट्य यांसारख्या सर्जनशील प्रकारांचा वापर करता येईल. (National Financial Literacy Quiz 2026)
एनएफएलक्यू 2026 हा विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता बळकट करण्यासाठी एनआयएसएमकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रोखे बाजार, आर्थिक उत्पादने, गुंतवणूकदारांचे हक्क आणि बाजारातील मध्यस्थांची भूमिका यांविषयी सखोल माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या एनआयएसएमच्या प्रमुख जनजागृती कार्यक्रमाचा ही प्रश्नमंजूषा एक भाग आहे. या अंतर्गत मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, गुवाहाटी आणि कोलकाता येथे रिजनल राउंड्स आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर राष्ट्रीय अंतिम फेरी नोव्हेंबर 2026 होणार आहे.
महाराष्ट्रातील रसायनीमधील पातळगंगा येथील एनआयएसएम कॅम्पमध्ये महाअंतिम फेरी आयोजित करण्यात येईल. या फेरीत देशभरातील सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ राष्ट्रीय विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.
एका दृष्टिक्षेपात : पारितोषिके आणि गौरव
रिजनल राउंड्स मधील प्रत्येक श्रेणीतील (पदवी आणि पदव्युत्तर गट) पहिल्या तीन विजेत्यांसाठी पारितोषिके:
पदवी गट :
• प्रथम पारितोषिक – रु.40,000/- वाणिज्य विभाग, किशिनचंद चेलाराम महाविद्यालय
• द्वितीय पारितोषिक – रु.30,000/- फायनान्स विभाग, जय हिंद महाविद्यालय एम्पॉवर्ड ऑटोनॉमस
• तृतीय पारितोषिक – रु.20,000/- तंत्रज्ञान विभाग, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
पदव्युत्तर गट :
• प्रथम पारितोषिक – रु.40,000/- फायनान्स विभाग, लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
• द्वितीय पारितोषिक – रु.30,000/- एमबीए, जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स
• तृतीय पारितोषिक – रु.20,000/- व्यवस्थापन विभाग, संत कबीर इन्स्टिट्यूट ञफ प्रोफेशनल स्टडीज
या शिवाय, पश्चिम विभागातील पदवी अभ्यासक्रमांची 12 महाविद्यालये राष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरली.
निवड करण्यात आलेल्या संस्थांची यादी पुढीलप्रमाणे आहे :
• वाणिज्य विभाग, किशिनचंद चेलाराम कॉलेज
• फायनान्स विभाग, जय हिंद कॉलेज एम्पॉवर्ड ऑटोनॉमस
• तंत्रज्ञान विभाग, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
• व्यवसाय प्रशासन विभाग, माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (डी), पुणे
• बीबीए, डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिझनेस, पुणे
• व्यवसाय प्रशासन विभाग, बी. आर. सी. एम. कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, सुरत
• व्यवस्थापन अभ्यास विभाग, आत्मीय युनिव्हर्सिटी
• डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल मार्केट्स, के. पी. बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स
• विधी विभाग, वनस्थळी विद्यापीठ
• वाणिज्य विभाग, सोनोपंत दांडेकर कला, व्ही. एस. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय
• कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, वनस्थळी विद्यापीठ, राजस्थान (वाइल्ड कार्ड)
• बी. टेक. विभाग, एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च, नागपूर (वाइल्ड कार्ड)
पश्चिम विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची 12 महाविद्यालये राष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरली.
निवड करण्यात आलेल्या संस्थांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
• डिपार्टमेंट ऑफ फायनान्स, लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
• एमबीए, जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स
• व्यवस्थापन विभाग, सेंट कबीर इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज
• एमबीए, पारुल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च
• एमबीए, एमव्हीपीज कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग
• वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन, नागपूर
• व्यवस्थापन विभाग (आयबीएस), आयसीएफएआय बिझनेस स्कूल
• वाणिज्य विभाग, किशिनचंद चेलाराम कॉलेज
• एमएमएस, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई
• व्यवस्थापन विभाग, अशोका बिझनेस स्कूल, पुणे
• व्यवस्थापन विभाग, सनशाइन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (वाइल्ड कार्ड)
• व्यवस्थापन अभ्यास विभाग, एसएसव्हीपीएसचे बी. एस. देवरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (वाइल्ड कार्ड)