मुंबई : (Naseeruddin Shah Jantar Mantar Movement) नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरु झालेले कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सोमवार, दि.२० जुलै रोजी हिंसक वळणावर जाताना दिसले. मुळ मुद्द्याला बगल देत काही हिंसक प्रवृत्तीच्या आंदोलकांनी हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे पोलिसांची वाहने जाळणे, पोलिसांवर दगडफेक, त्यांच्यावर जमावाकडून हल्ले अशा गोष्टी घडल्या. अशा या हिंसक प्रवृत्तीच्या आंदोलनकर्त्यांची पाठराखण करणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे नेटकरी आणि सर्वसामान्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
जंतर-मंतरवर झालेल्या तथाकथित आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावर मौन सोडत शाह यांनी एक भावनिक व्हिडिओ जारी केला खरा, पण त्यात त्यांनी दाखवलेली 'एकांगी सहानुभूती' आणि कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांबद्दल वापरलेली आक्षेपार्ह भाषा पाहून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. (Naseeruddin Shah Jantar Mantar Movement)
नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये नसिरुद्दीन शाह यांनी पोलिसांना थेट 'गुंड' असे संबोधले. "कधीतरी स्वतःच्या मुलांचा विचार करा, तुमच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागतील," असा दमच त्यांनी पोलिसांना भरला. एवढेच नव्हे तर 'हिंमत हारू नका, संघर्ष सुरू ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत' असे म्हणत त्यांनी विद्यार्थी असल्याचा आव आणणाऱ्या समाजकंटकांना थेट पाठिंबा दर्शवला. याच समाजकंटकांनी केलेली दगडफेक नसिरुद्दीन शाह यांनी का दिसली नाही? पोलिसांना झालेली मारहाण आणि आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची केलेली तोडफोड यावर शाह एका शब्दानेही का बोलले नाहीत? असे प्रश्न आता जनता विचारत आहे. (Naseeruddin Shah Jantar Mantar Movement)
नसिरुद्दीन शाह आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. सामाजिक, राजकीय आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. २०२३ दरम्यान एका मुलाखतीदरम्यान मुघलांच्या इतिहासावर बोलताना ते म्हणाले होते की, 'मुघल हे आक्रमक किंवा भारतात लूटमार करण्यासाठी आलेले नव्हते, तर त्यांनी या देशाची उभारणी केली आणि ते राष्ट्रनिर्माते होते.' 'द काश्मीर फाइल्स', 'द केरला स्टोरी' आणि 'गदर २' यांसारख्या चित्रपटांच्या प्रचंड लोकप्रियतेला त्यांनी 'धोकादायक ट्रेंड' म्हणून संबोधले होते. या चित्रपटांची तुलना त्यांनी नाझी जर्मनीच्या काळातील प्रोपोगंडा चित्रपटांशी केली होती. (Naseeruddin Shah Jantar Mantar Movement)
नसिरुद्दीन शाह यांची ही भूमिका निषेधार्ह
नसिरुद्दीन शाह यांनी अभिनयाने जेवढी प्रतिष्ठा मिळवली, तेवढीच निष्पक्षता आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर त्यांनी गमावली आहे. देशातील शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या हिंसक समाजकंटकांना 'विद्यार्थी' ठरवून त्यांचे उदात्तीकरण करणे निंदनीय आहे. पोलिसांवर बेछूट आरोप करून आंदोलकांना पाठबळ देणारी त्यांची ही भूमिका निषेधार्ह आहे. (Naseeruddin Shah Jantar Mantar Movement)
- प्रिया सावंत, कोकण प्रांत उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक