मुंबई: (Dharavi Didi AI) माझ्या घराचं सर्वेक्षण झालं आहे का? प्रकल्पामध्ये मी पात्र आहे का? माझ्या हक्काचं नवं घर मला कधी मिळणार? असे अनेक प्रश्न आजही धारावीतील बहुतांशी स्थानिकांना पडलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धारावीकरांना त्यांचे शेजारी, परिसरात सुरू असलेल्या चर्चा किंवा इतर अनधिकृत माहितीवर अवलंबून राहावे लागत होते.(Dharavi Didi AI)
ही माहिती अधिकृत नसल्याने अनेकदा अफवा आणि गैरसमज पसरवले जात होते. मात्र, आता 'धारावी दीदी'च्या मदतीने, पुनर्विकासाविषयी कोणतीही अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती धारावीकरांना सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. 'धारावी दीदी' हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डिजिटल सहकारी दररोज 24 तास स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असेल.(Dharavi Didi AI)
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम एकीकडे वेगाने पुढे सरकत असताना, दुसरीकडे मात्र स्थानिकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कायम आहेत. हेच लक्षात घेता धारावीतील रहिवाशांना केंद्रस्थानी ठेवून, त्वरित 'धारावी दीदी' ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. 'धारावी दीदी'च्या सहाय्याने, घराचे सर्वेक्षण, पात्रता, आवश्यक दस्तावेज यांसह पुनर्विकास प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती स्थानिकांना सहजतेने मिळवता येईल.(Dharavi Didi AI)
हा उपक्रम म्हणजे एएनडीपीएल आणि स्थानिकांमधील सुसंवादाचे प्रतीक आहे. जनतेशी थेट संपर्क साधतानाच, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून, अधिकृत माहिती पारदर्शक पद्धतीने, सुलभतेने स्थानिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असल्याने, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची वाट न पाहता नागरिकांना कधीही अपेक्षित माहिती मिळवता येईल.(Dharavi Didi AI)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक