
महानगरपालिकेच्या समाज माध्यमांच्या व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेकडून (आउटसोर्सिंग) सोशल मीडिया एक्स्पर्ट, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओग्राफर आणि अनुवादक यांसह एकूण १९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कामासाठी पालिकेने राबवलेल्या ई-निविदा प्रक्रियेत 'मे. रनटाईम सोल्यूशन्स प्रा. लि.' या कंपनीला १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी २ कोटी ८४ लाख ८२ हजार १३१ रुपयांचे मूळ कंत्राट दिले होते. आता याच कंत्राटदाराला १ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या एका वर्षाच्या अतिरिक्त कालावधीसाठी मुदतवाढ देताना थेट ४ कोटी ४९ लाख ४१ हजार २७४ रुपयांचे कंत्राट देऊ करण्यात आले आहे. (BMC Social Media Contract)
कंत्राटातील बदल
कंत्राटदार कंपनी: मे. रनटाईम सोल्यूशन्स प्रा. लि.
मूळ कंत्राट रक्कम (२ वर्षे): २ कोटी ८४ लाख ८२ हजार
अतिरिक्त वाढीव रक्कम (१ वर्ष): १ कोटी ६४ लाख ५९ हजार
एकूण सुधारित कंत्राट रक्कम: ४ कोटी ४९ लाख ४१ हजार २७४
असे असेल १९ पदांचे पदनिहाय मनुष्यबळ:
कंटेंट डिझायनर / रायटर / रिसर्चर : १४
सोशल मीडिया एक्स्पर्ट : ०१
ग्राफिक डिझायनर : ०१
व्हिडिओग्राफर : ०१
फोटोग्राफर : ०१
अनुवादक : ०१