मुंबई : (Gyan Gudi Bastar) दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या नीट पेपरफुटीच्या आंदोलनादरम्यान छत्तीसगडमधून एक आनंदाची बातमी समोर येते आहे. बस्तर जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या 'ज्ञान गुडी' या मोफत निवासी कोचिंग उपक्रमातील तब्बल ४७ विद्यार्थ्यांनी 'नीट' परीक्षा उत्तीर्ण केली असून, बस्तरच्या वनक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे यश ठरले आहे. बस्तरचे जिल्हाधिकारी आकाश छिकारा यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या या कामगिरीमुळे केवळ त्यांच्या पालकांचाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला असल्याचे सांगितले. (Gyan Gudi Bastar)
बस्तर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम असलेल्या ज्ञान गुडीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५० विद्यार्थी नीट परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, तर चार जण नर्सिंगमध्ये पात्र ठरले आहेत. त्यांचे समुपदेशन पुढील महिन्यात सुरू होईल आणि त्यांना चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी आशा आहे; असे आकाश छिकारा म्हणाले. (Gyan Gudi Bastar)
छिकारा यांनी पुढे सांगितले की, प्रशासन या कोचिंग उपक्रमाचा विस्तार फक्त नीट आणि जेईईपुरता मर्यादित न ठेवता एसएससी आणि बँकिंगसारख्या स्पर्धा परीक्षांचाही यात समावेश करण्याचा विचार करत आहे. आम्हाला आशा आहे की ते पुढे जाऊन उत्तम डॉक्टर बनतील आणि आमच्या भागातील वैद्यकीय सुविधा सुधारण्यात मोलाची भूमिका बजावतील. आम्ही आमची तयारी केवळ नीट आणि जेईई परीक्षांपुरती मर्यादित न ठेवता एसएससी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान, गणित व इंग्रजी यांसारख्या सामान्य विषयांवर प्रश्न विचारल्या जाणाऱ्या इतर परीक्षांपर्यंत विस्तारण्याचा प्रयत्न करत आहोत. (Gyan Gudi Bastar)
ज्ञान गुडीचे प्रभारी अलेक्झांडर चेरियन यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ३७९ विद्यार्थ्यांनी नीटसाठी नोंदणी केली होती, ज्यांपैकी २४० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक मुलामध्ये गुणवत्ता असते, फक्त तिला वाव देणे आवश्यक असते. अनेक जण आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, तर आमचे ३७ विद्यार्थी 'पॅट' परीक्षेमध्ये निवडले गेले आहेत. त्यांनी छत्तीसगडमधील विविध विद्यापीठे आणि कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे, असे चेरियन म्हणाले. (Gyan Gudi Bastar)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक