सिडकोच्या ईडब्ल्यूएस गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत; ८,७९५ सदनिकांसाठी लाभार्थी निश्चित

    21-Jul-2026
CIDCO
 
मुंबई : (CIDCO) सिडकोच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा 1st चॉइस" या गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात पार पडली. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.(CIDCO)
 
या कार्यक्रमाला सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. राजा दयानिधी, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (एनआयसी) संचालक (आयटी) नरेंद्र भामरे, उपसंचालक (आयटी) हबीबा ए. एल., प्रभारी महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) श्रीनिवास मोकळीकर यांच्यासह सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(CIDCO)
 
यावेळी बोलताना अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देणे हे सिडकोचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य आणि नामांकित कंपन्यांनी तयार केलेले आराखडे यामुळे सिडकोची घरे दर्जेदार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(CIDCO)
 
डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे आणि खारकोपर येथे एकूण ८,७९५ ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सदनिकांसाठी १०,८३२ अर्ज प्राप्त झाले होते. संगणकीय सोडत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडल्याचे सिडकोने स्पष्ट केले.(CIDCO)
 
दरम्यान, ही सोडत केवळ ईडब्ल्यूएस प्रवर्गापुरतीच मर्यादित होती. इतर प्रवर्गातील सदनिकांची सोडत मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली असून संबंधित अर्जदारांनी याची नोंद घ्यावी, असे सिडकोने कळविले आहे. सोडतीतील यशस्वी अर्जदारांची यादी www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.(CIDCO)
 
 




संबंधित मजकूर