एसआयआर सर्वेक्षणादरम्यान धर्मांध मुस्लिमांचे बीएलओ महिलेसोबत गैरवर्तन

दिल्ली पोलिसांची चार जणांविरोधात कडक कारवाई

    17-Jul-2026   
Election Commission
 
मुंबई : (Election Commission) दिल्लीतील चांदणी महल परिसरात सरकारी कामावर असलेल्या एका महिला शिक्षिकेशी गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. एसआयआर प्रक्रियेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्त असलेल्या या महिला शिक्षिकेशी काही धर्मांध मुस्लिम व्यक्तींनी कथितपणे अभद्र वर्तन केल्याचा आरोप आहे. महिला शिक्षिकेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या विरोधानंतरही एका आरोपीने त्यांच्या मांडीवर रजिस्टर ठेवून जबरदस्तीने स्वाक्षरी केली. या प्रकरणात कारवाई करत दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे मोहम्मद सबरीन (४४), अतीक उर रहमान (५८), मोहम्मद आसिफ (५०) आणि मोहम्मद आफताब (४४) अशी आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका मध्य दिल्लीतील चांदणी महल परिसरातील फाटक तेलियान येथे निवडणुकीशी संबंधित सरकारी काम पार पाडत होत्या. ड्युटीदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. महिला शिक्षिकेने आपल्या तक्रारीत नमूद केले की, एका आरोपीने त्यांच्या हातातील बीएलओ रजिस्टर जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांनी विरोध करूनही त्या व्यक्तीने त्यांच्या मांडीवर रजिस्टर ठेवून स्वाक्षरी केली. तसेच घटनास्थळी उपस्थित इतर काही व्यक्तींनीही त्यांच्याशी अत्यंत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.(Election Commission)
 
पीडित महिला शिक्षिकेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित अनेकांनी त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन केले. आरोपींनी एसआयआर फॉर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यांना अश्लील शिवीगाळही केली. याचबरोबर त्यांना सरकारी कर्तव्य बजावण्यापासून जबरदस्तीने रोखण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीची पडताळणी आणि घटनास्थळी उपलब्ध पुराव्यांची तपासणी केल्यानंतर चांदणी महल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्पर कारवाई करत तक्रारीत नामनिर्देशित चारही आरोपींना त्यांच्या घरातून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे चारही आरोपी जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातील रहिवासी असून, त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.(Election Commission)
 
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने दिल्लीत सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. ही प्रक्रिया आता आणखी दहा दिवस वाढविण्यात आली असून, पूर्वी २९ जुलै रोजी पूर्ण होणारे काम आता ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी मतदार यादीचा प्रारूप (ड्राफ्ट) प्रसिद्ध केला जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना त्यावर दावे व हरकती नोंदविता येतील. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.(Election Commission)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर