मुंबई (Bhushan Marde Mother Passes Away) : भारत मंथन फाउंडेशनचे संचालक भूषण मर्दे यांच्या मातोश्री कै. कुंदा रामचंद्र मर्दे यांचे बुधवार, दि. १५ जुलै रोजी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. घरी असताना अचानक प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
गुरुवारी सकाळी शिवाजी पार्क दादर येथील विद्युतदाहिनी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडं, पतवंड असा परिवार आहे. (Bhushan Marde Mother Passes Away)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक