मुंबई मेट्रो वनला मोठा आर्थिक दिलासा; ₹1,100 कोटींच्या कर्जातून मुक्तता

Mumbai Metro One Debt Restructuring
 
मुंबई : (Mumbai Metro One Debt Restructuring) मुंबईतील वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो-१) मार्ग चालवणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कंपनीवरील सुमारे १,१०० कोटींचा कर्जाचा बोजा कमी होणार असून, कंपनीविरोधातील दिवाळखोरी प्रक्रिया देखील मागे घेतली जाणार आहे.
 
यासाठी एमएमओपीएलने केंद्र सरकारच्या पाठबळ असलेल्या नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड सोबत २,७७१.३२ कोटींचा कर्ज पुनर्रचना करार केला आहे.(Mumbai Metro One Debt Restructuring)
 
या करारामुळे मेट्रो वनवरील मोठा आर्थिक ताण कमी होणार असून, कंपनीला दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्यास मदत मिळेल. त्यामुळे मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाचे संचालन अधिक स्थिरपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Mumbai Metro One Debt Restructuring)
 
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा ७४ टक्के आणि MMRDA चा २६ टक्के हिस्सा आहे. वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर हा मार्ग दररोज पाच लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देतो.
 
करारानुसार, एनएआरसीएलला एमएमओपीएलच्या संचालक मंडळावर एक संचालक नियुक्त करण्याचा अधिकार असेल. तसेच कर्जदाते आणि एमएमओपीएलच्या प्रतिनिधींची संयुक्त मॉनिटरिंग समिती या पुनर्रचना प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे.(Mumbai Metro One Debt Restructuring)
 
या आर्थिक पुनर्रचनेमुळे मुंबई मेट्रो वनची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, प्रवाशांना अखंड आणि सुरळीत सेवा देण्यासाठीही या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.(Mumbai Metro One Debt Restructuring)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर