आयटीआयचा नियमित निधी सुरक्षित; 'स्टेप'साठी वापर नाही : मंत्री मंगलप्रभात लोढा

"स्टेप" कोर्सेसवर मंत्री मंगलप्रभात लोढांचे स्पष्टीकरण

ITI STEP Courses Maharashtra
 
मुंबई : (ITI STEP Courses Maharashtra) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 'स्टेप' उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या शॉर्ट टर्म व ॲडव्हान्स कोर्सेससाठी नियमित आयटीआय अभ्यासक्रमाचा निधी वापरण्यात आलेला नसून, त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे नियमित अभ्यासक्रमावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य संजय खोडके यांनी 'स्टेप' उपक्रमातील कथित अनियमिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते.(ITI STEP Courses Maharashtra)
 
मंत्री लोढा म्हणाले की, बदलत्या काळानुसार अल्पकालीन व प्रगत कौशल्य प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉलिड, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिकल फिटिंग आदी विषयांतील शॉर्ट टर्म आणि ॲडव्हान्स कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. हे कोर्सेस स्वतंत्र निधीतून राबविण्यात आले असून, नियमित आयटीआय अभ्यासक्रमाच्या निधीतून एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही.(ITI STEP Courses Maharashtra)
 
राज्यात गेल्या तीन वर्षांत आयटीआयमध्ये विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आले असून, त्याचा सकारात्मक परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. यंदा आयटीआयमधील प्रवेशाचे प्रमाण सुमारे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. आयटीआयमधील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्यामुळे खोट्या नोंदी करून आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.(ITI STEP Courses Maharashtra)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर