मुंबई : (RTO Corruption Maharashtra) परिवहन विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिला. आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली.
विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली. त्यास उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे आणि मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (RTO Corruption Maharashtra)
या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीसाठी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. (RTO Corruption Maharashtra)
"परिवहन विभागात भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही. चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये आणि सत्य बाहेर यावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल," असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. (RTO Corruption Maharashtra)
राज्याच्या परिवहन व्यवस्थेत पारदर्शकता, जबाबदारी आणि जनविश्वास अबाधित ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई भविष्यातही तितक्याच कठोरपणे सुरू राहील, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. (RTO Corruption Maharashtra)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.