रिलायन्स जिओचा आयपीओ बाजारात येणार! मुकेश अंबानी यांनी केली मोठी घोषणा

४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानींची घोषणा

    19-Jun-2026   

Jio IPO
 
 
मुंबई (Reliance Jio IPO) (विशेष प्रतिनिधी) : गुंतवणूकदारांना बहुप्रतिक्षित रिलायन्स समुहाच्या ४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. कंपनी बोर्डाने जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला मंजूरी दिली आहे. प्रार्थमिक माहितीनुसार, कंपनीच्या प्रस्तावित आयपीओचा मसुदा माहितीपत्रक सेबीकडे सादर केले आहे. याचा अर्थ लवकरच जिओचा आयपीओ बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी ही माहिती दिली.
 
 अंबानी म्हणाले, “जिओ लिस्टींगमुळे भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील गुणवत्ता जगापुढे येण्यास मदत होईल. भारतही वैश्विक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात, भव्य आणि मुल्य असणारी आघाडीवर असलेली तांत्रिक क्षमतेची कंपनी उभी करू शकतो.”
‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या सहाय्यक कंपनी असलेल्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड’च्या आयपीओला सर्वसाधारण बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.
 
संबंधित मसूदा सेबी, बीएसई लिमिटेड तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे (निफ्टी) दाखल करण्यात आला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमधील शेअरचा अंतिम दर बुक-बिल्डिंग प्रक्रियेतून म्हणजेच गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार निश्चित केला जाईल, अशी माहिती बीएसईला जिओ मार्फत देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा आयपीओ बाजारात येईल.
 
भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो!
 
गुंतवणूकदारा तज्ज्ञांच्या मते, जिओ प्लॅटफॉर्म्सचे मुल्यांकन १३० अब्ज डॉलर्स ते १८० अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकते. जर तसे झाल्यास हा इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. कंपनीने अद्याप याचे भांडवली मुल्य निश्चित केलेले नाही. उपलब्ध माहितीनुसार, जिओमध्ये सध्या रिलायन्सचा ६६.४३ टक्के हिस्सा आहे. मेटाचा हिस्सा ३३.५७ टक्के तर उर्वरित १७.७१ हिस्सा गुगलकडे आहे. विश्लेषकांच्या मते, एनएसईचा ३० हजार कोटींचा आयपीओही प्रस्तावित आहे. हा आयपीओ जगातील सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. त्याचवेळी जिओचा आयपीओसाठी सर्वात महत्वाची घटना मानली जात आहे.





तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर