US-Iran-Israel War : अखेर अमेरिका-इराण युद्धाला 'ब्रेक'! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; काय म्हणाले?

    23-Mar-2026   

US-Iran-Israel War


मुंबई : (US-Iran-Israel War)
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प इराणबरोबर सातत्याने चर्चा करत होते. या चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्या असून इराणवरील नियोजित लष्करी हल्ल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. तसेच पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.(US-Iran-Israel War)
 
ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

ट्रुथ सोशलवरील पोस्टच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात माहिती दिली. याबाबत ट्रम्प म्हणाले, "गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेतील संघर्षाच्या संपूर्ण आणि कायमस्वरूपी निराकरणाबाबत अतिशय सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली असून, पुढील एक आठवडा ही चर्चा सुरू राहणार आहे. मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत", अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. तसेच, मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.(US-Iran-Israel War)


होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करा, अन्यथा इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करू, असा इशारा ठोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याला गांभीर्याने घेऊन इराणने शत्रू देशांना वगळता इतर देशांकरिता हा मार्ग खुला केला. इराणने अमेरिकेच्या आदेशाचे पालन केल्याने अमेरिकेनेही आता इराणवरील ऊर्जा प्रकल्पांवरील नियोजित हल्ल्यांना स्थगिती दिली आहे.(US-Iran-Israel War)







अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
संबंधित मजकूर