लक्ष्मीपूजा आणि धनत्रयोदशीला देशभरात ६२ हजार कोटींच्या सोन्याच्या विक्रीचा अंदाज!

सोन्याच्या दरातील तेजीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला; तरुण पिढीही सोन्याच्या खरेदीकडे आकर्षित

    09-Nov-2026
 
62,000 Crore Gold Sales Diwali 2026
 
मुंबई (62,000 Crore Gold Sales Diwali 2026) : यंदा लक्ष्मीपूजा आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सोन्याची विक्री सुमारे ६२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या दरातील तेजी आणि ग्राहकांचा वाढता विश्वास यामुळे यंदाच्या सणासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले.
 
मागील वर्षीच्या लक्ष्मीपूजेपासून यंदाच्या लक्ष्मीपूजेपर्यंत सोन्याने सुमारे ९ ते १४ टक्के परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून, दिवाळीच्या काळात सोन्याचे दर १ लाख ४२ हजार ते १ लाख ४३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास होते. यंदा सोन्याचे दर १ लाख ८१ हजार ते १ लाख ८५ हजार रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर दरात झालेल्या घसरणीमुळे सध्याचे भाव ग्राहकांना तुलनेने परवडणारे वाटत आहेत. (62,000 Crore Gold Sales Diwali 2026)
 
सोन्याच्या दरातील या वाढीमुळे ग्राहकांचा सोन्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा Gen Z आणि तरुण पिढीमध्येही सोन्याची खरेदी करण्याबाबत उत्साह दिसून आला, असे रोकडे यांनी नमूद केले.
 
भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजा आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या सणांच्या काळात सोन्याच्या खरेदीला विशेष महत्त्व प्राप्त होते. (62,000 Crore Gold Sales Diwali 2026)
 
सोन्याच्या दीर्घकालीन कामगिरीविषयी बोलताना रोकडे म्हणाले की, गेल्या २६ वर्षांत सोन्याने सुमारे ३२०० टक्के परतावा दिला आहे. आर्थिक मंदी, युद्धे आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा सामना करूनही सोन्याने आपली विश्वासार्हता कायम राखली आहे. त्यामुळे केंद्रीय बँका, विविध देशांची सरकारे तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदार सोन्याकडे विश्वासार्ह संपत्ती म्हणून पाहतात.
 
सोन्याच्या भविष्यातील दरांबाबत सकारात्मक दृष्टिकोन
 
सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत सकारात्मक मत व्यक्त करताना राजेश रोकडे यांनी सांगितले की, यंदा सोन्याचे दर सध्याच्या स्तरावर स्थिर राहिले, तरी पुढील वर्षी सोन्याच्या किमती नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या बाजारात आगामी काळातही तेजी कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (62,000 Crore Gold Sales Diwali 2026)




संबंधित मजकूर