मुंबई (Annabhau Sathe Theatre Mumbai): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) परिसरातील ऐतिहासिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा तब्बल ४२ वर्षांचा वनवास आता संपला आहे. मुंबई महानगरपालिकेने रंगमंचाच्या तांत्रिक रचनेतील सर्व त्रुटी दूर केल्या असून, डिसेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात येथे एका भव्य नाट्य महोत्सवाने नाटकाची ’तिसरी घंटा’ वाजणार आहे जुलै महिन्यात या नूतनीकृत नाट्यगृहाचे लोकार्पण झाले होते.
हे नाट्यगृह १९६३ मध्ये खुले थिएटर म्हणून सुरू झाले होते परंतु, नाटकांच्या आवाजामुळे बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना त्रास होऊ नये, म्हणून १९८४ मध्ये ते पूर्णपणे बंद करण्यात आले होते. पालिकेने आता या संपूर्ण वास्तूचे रूपांतर एका भव्य, पूर्णपणे बंदिस्त आणि वातानुकूलित इनडोअर थिएटरमध्ये केले आहे . त्यामुळे परळ, लालबाग, माझगाव आणि भायखळा परिसरातील मराठी नाट्य रसिकांना आता हक्काचे मनोरंजनाचे केंद्र मिळाले आहे. (Annabhau Sathe Theatre Mumbai)
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित होणार्या या नाट्य महोत्सवात सलग सात दिवस दररोज नामांकित मराठी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होतील. नाट्य रसिकांना आकर्षित करण्यासाठी या महोत्सवातील तिकिटांचे दर पालिकेकडून अत्यंत कमी आणि सर्वसामान्यांना परवडणारे ठेवले जाणार आहेत. नाट्यगृहाची प्रसिद्धी व्हावी यासाठी सुरुवातीच्या काही प्रयोगांना पालिकेने नाट्य निर्मात्यांना विशेष सवलती देण्याचीही तयारी दर्शवली आहे. (Annabhau Sathe Theatre Mumbai)
अशा आहेत ७६१ आसनी नाट्यगृहाच्या सुविधा:
भव्य रंगमंच: २१ मीटर रुंदी आणि ११ मीटर लांबीचा विस्तीर्ण रंगमंच .