ठाणे (Additional Collector Office in Kalyan): जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये अधिकृतपणे 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय, कल्याण' स्थापन करण्यास महसूल व वन विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मान्यता दिली आहे.
भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ या चार तालुक्यांतील नागरिकांना लहान-सहान कामांसाठीही ठाणे येथे जावे लागत असे. या नव्या कार्यालयामुळे या चारही तालुक्यांतील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार असून, शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. (Additional Collector Office in Kalyan)
या नवीन रचनेनुसार कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ हे चार तालुके कल्याण कार्यालयाच्या कक्षेत येतील, तर ठाणे, भिवंडी आणि शहापूर हे तीन तालुके ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत राहतील. (Additional Collector Office in Kalyan)
कल्याण कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांची पदे शासन स्तरावरून भरली जातील. तसेच, या नवीन कार्यालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तात्पुरती जागा निश्चित करण्याचे व पुढील १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Additional Collector Office in Kalyan)