कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींवर दहशतवादाचा खटला चालणार; राजस्थान उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

    07-Nov-2026   
 
 Kanhaiya Lal Murder Case
 
मुंबई (Kanhaiya Lal Murder Case) : जयपूरच्या कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींवर आता दहशतवादाच्या आरोपांखाली खटला चालवला जाणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाने यावर शिक्कामोर्तब केले. विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने हे आदेश योग्य ठरवत त्यांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
 
मुख्य न्यायमूर्ती संजय के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचे आदेश वैध ठरवले आहेत. मोहम्मद रियाज अत्तारी, मोहम्मद गौस, मोहसीन खान, आसिफ हुसैन, मोहम्मद मोहसिन, वसीम अली, मोहम्मद जावेद खान आणि मुस्लिम खान या आरोपींविरोधातील खटला एनआयए न्यायालयात सुरूच राहणार आहे. (Kanhaiya Lal Murder Case)
 
एनआयए न्यायालयात आरोपींविरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलम १६ (दहशतवादी कृत्य), कलम १८ (दहशतवादी कट) आणि कलम २० (दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे) यांसह भारतीय दंड संहितेतील अन्य गंभीर कलमांनुसार खटला चालवला जात आहे.
 
कन्हैयालाल हे उदयपूरमधील शिंपी होते. २८ जून २०२२ रोजी ते आपल्या दुकानात असताना आरोपींनी विश्वासघाताने त्यांची निर्घृण हत्या केली होती. या हत्येचा व्हिडिओ चित्रित करून आरोपींनी तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता. (Kanhaiya Lal Murder Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर