ठाणे जिल्ह्यात आकाशकंदील उडविण्यास बंदी; ५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विक्री आणि साठवणुकीलाही मनाई!

आगीच्या दुर्घटना आणि जीवित-मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

    06-Nov-2026

Thane Sky Lantern Ban
 
ठाणे : दिवाळीच्या काळात आकाशकंदील उडविताना आग लागून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने आकाशकंदील उडविणे, विक्री करणे आणि साठवणूक करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. (Thane Sky Lantern Ban)
 
दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात आकाशकंदील आकाशात सोडले जातात. मात्र, उडविलेला आकाशकंदील पेटलेल्या अवस्थेत घरांवर, इमारतींवर किंवा ज्वलनशील वस्तूंवर पडल्यास मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या शिफारशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. (Thane Sky Lantern Ban)
 
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही बंदी लागू राहणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Thane Sky Lantern Ban)
 
 
 




संबंधित मजकूर