मुंबई (विशेष प्रतिनिधी ) - Onkar Bhojane Milind Zumber Kavdeमराठी अभिनेता ओंकार भोजने आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्यातील वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. ‘आफरातफरी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीवरून सुरू झालेल्या वादानंतर ओंकारने मिलिंद कवडे यांना ५० लाख रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही नोटीस प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. तर ओंकारच्या नोटिशीला उत्तर देताना मिलिंद कवडे यांनी ॲड. दीपाली आर. बोहरा यांच्या मार्फत तब्बल ३० पानी कायदेशीर प्रत्युत्तर पाठवले आहे. त्यांनी मानहानीचे आरोप आणि ५० लाखांच्या भरपाईची मागणी फेटाळली आहे. तसेच मिलिंद कवडे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ओंकार भोजनेमुळे चित्रपटाच्या निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नोटिशीतील उत्तरात नमूद केले आहे. हा केवळ प्रमोशनसाठी वेळ न देण्याचा विषय नसून शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच काही अडचणी सुरू झाल्याचा त्यांचा दावा आहे.
‘आफरातफरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ओंकार भोजने सहभागी होत नसल्याचा आरोप दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एका मुलाखतीत केला होता. ओंकारच्या अनुपलब्धतेमुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले होते.या मुलाखतीदरम्यान कवडे यांनी ओंकारसंदर्भात ‘सराईत पाकीटमार’ आणि ‘सराईत खोटारडा’ अशा शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. ही विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच चिघळले.Onkar Bhojane Milind Zumber Kavde
ओंकारच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, प्रदर्शनाच्या तारखांमध्ये वारंवार बदल करण्यात आले. त्यामुळे त्याच्या आधीपासून निश्चित असलेल्या व्यावसायिक कामांमुळे काही प्रमोशनल कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही.विशेष म्हणजे, व्यस्त वेळापत्रक असूनही त्याने दोन माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. स्वतःचे वैयक्तिक सोशल मीडिया खाते नसतानाही सुमारे १३० संपर्कांना चित्रपटाचे टीझर, ट्रेलर आणि गाणी पाठवून प्रसिद्धीसाठी मदत केल्याचे नोटिशीत नमूद आहे.Onkar Bhojane Milind Zumber Kavde
भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 356 (मानहानी) अंतर्गत तसेच दिवाणी कायद्यानुसार मिलिंद कवडे यांनी केलेल्या सर्व विधानांची जाहीर बिनशर्त माफी मागावी, विधाने मागे घ्यावीत, भविष्यात अशी विधाने करू नयेत आणि 50,00,000/- (पन्नास लाख रुपये) भरपाई द्यावी. दिवाळीनंतर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.Onkar Bhojane Milind Zumber Kavde
कवडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी केलेली विधाने ही चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रसिद्धीदरम्यान आलेल्या व्यावसायिक अडचणींच्या संदर्भात होती. चित्रीकरण, डबिंग आणि प्रमोशनच्या वेळी ओंकारकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचेही त्यांनी प्रत्युत्तरात म्हटले आहे. तसेच मुलाखतीत वापरलेला ‘सराईत पाकीटमार’ हा शब्द केवळ एका सर्वसामान्य संदर्भाचा भाग होता आणि तो थेट ओंकार भोजने याच्यासाठी वापरला नव्हता, असा खुलासा कवडेंनी केला आहे. ओंकारच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबतही काही वेगळे अनुभव आल्याचे कवडे यांनी सांगितले. ओंकारच्या खोलीत त्याच्याव्यतिरिक्त त्याचे मित्रही राहायचे. इतर कोणत्याही कलाकाराला अशा प्रकारची परवानगी दिलेली नसताना ओंकारच्या बाबतीत मात्र हे घडत होते. विशेष म्हणजे, याबाबत निर्मिती टीमला आधी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले आहे.Onkar Bhojane Milind Zumber Kavde
चित्रपटाच्या पोस्टप्रॉडक्शनमध्येही अडचणी आल्याचा दावा कवडे यांनी केला आहे. डबिंगसाठी ओंकारकडून जवळपास दोन ते तीन महिने तारखा मिळाल्या नाहीत. त्यानंतर तीन महिन्यांनी डबिंगसाठी तारखा उपलब्ध झाल्या. या विलंबामुळे चित्रपटाची एक महत्त्वाची प्रदर्शनाची तारीख हुकल्याचे कवडे यांनी सांगितले आहे.चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आवश्यक असलेल्या पोस्टर शूटच्या वेळीही अडचण निर्माण झाल्याचे कवडे यांनी सांगितले. पोस्टर शूटसाठी इतर सर्व कलाकार तयार होते. मात्र, ओंकारची उपस्थिती नसल्यामुळे नियोजित पोस्टर शूट होऊ शकले नाही. परिणामी, निर्मात्यांना अखेर AI जनरेटेड पोस्टर तयार करावे लागले.या पोस्टरवरून सोशल मीडियावर चित्रपटाच्या टीमला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'साधे पोस्टर शूटही करता येत नाही का? AI जनरेटेड पोस्टर का बनवले?' अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आल्या. त्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीवरही त्याचा परिणाम झाल्याचे कवडे यांचे म्हणणे आहे.
Onkar Bhojane Milind Zumber Kavde
कवडे यांच्या मते, शूटिंग, राहण्याची व्यवस्था, वैयक्तिक प्रवास, डबिंग, पोस्टर शूट आणि प्रमोशन अशा प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणींचा तपशील नोटिशीतील उत्तरात मांडण्यात आला आहे. नोटिशीव्यतिरिक्त कोणतीही नवीन बाब आपण सांगत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Onkar Bhojane Milind Zumber Kavde
एका बाजूला ओंकार भोजनेने मिलिंद कवडे यांच्याकडे ५० लाख रुपयांची मानहानीची भरपाई आणि सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कवडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंतच्या अनुभवांचा दाखला देत आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे ‘अफरातफरी’ चित्रपटाच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद आता केवळ प्रमोशनपुरता मर्यादित राहिलेला नाही. कलाकार आणि निर्माते यांच्यातील व्यावसायिक जबाबदारी, परस्पर सहकार्य आणि चित्रपटाच्या निर्मितीतील शिस्त या मुद्द्यांवरही या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.Onkar Bhojane Milind Zumber Kavde