मुंबई (Mumbai Government Holiday November 9): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी, सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले.
दि. ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी असून दि. १० नोव्हेंबर रोजी दिवाळी तर, ११ नोव्हेंबरला भाऊबीजेनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबर रोजी सुट्टी दिल्यास सलग पाच दिवस सुट्टया होतील. शिवाय दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोयही होणार नाही. त्यामुळे ९ तारखेला सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. (Mumbai Government Holiday November 9)
या वर्षात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी ही तिसरी स्थानिक सुट्टी आहे. यापूर्वी गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. गोपाळकाला अर्थात दहीहंडीची ५ सप्टेंबरची सुट्टी शनिवारी आल्याने ती २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोमवारी, तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. (Mumbai Government Holiday November 9)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....