अवघ्या १५ रुपयांत २४ तास अनलिमिटेड 5G डेटा; जिओचा नवा प्लॅन लॉन्च

ऑनलाइन गेमिंग आणि मोठ्या फाइल्स डाउनलोड करण्याची सुविधा; मायजिओ ॲप, जिओ वेबसाइट आणि अन्य रिचार्ज प्लॅटफॉर्मवर देशभर उपलब्ध

    06-Nov-2026
 
 
Jio ₹15 Unlimited 5G Data Pack
 
मुंबई : (Jio ₹15 Unlimited 5G Data Pack) रिलायन्स जिओने अवघ्या १५ रुपयांत अनलिमिटेड 5G डेटा देणारा नवा पॅक लॉन्च केला आहे. या पॅकची वैधता २४ तास असून, या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही डेटा मर्यादेची चिंता न करता हाय-स्पीड 5G इंटरनेटचा वापर करता येणार आहे. जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन जिओने हा विशेष पॅक सादर केला आहे.
 
या नव्या पॅकमुळे ग्राहकांना 4K क्वालिटीमध्ये चित्रपट आणि व्हिडिओ पाहता येतील. तसेच लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंगचा आनंद घेण्यासोबतच मोठ्या फाइल्स डाउनलोड करणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे आणि क्लाउडवर डेटा अपलोड करणे यांसारखी कामेही सहज करता येतील. (Jio ₹15 Unlimited 5G Data Pack)
 
या पॅकच्या माध्यमातून ग्राहक आपल्या 5G स्मार्टफोनचा वाय-फाय हॉटस्पॉट म्हणून वापर करून लॅपटॉप आणि टॅबलेटवरही इंटरनेट वापरू शकतील. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, रिमोट वर्क आणि अन्य ऑनलाइन कामे करणे अधिक सोयीचे होणार आहे. (Jio ₹15 Unlimited 5G Data Pack)
 
जिओचा १५ रुपयांचा हा डेटा पॅक देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक मायजिओ ॲप, जिओ डॉट कॉम, रिटेल स्टोअर्स तसेच थर्ड पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा पॅक त्वरित ॲक्टिव्हेट करू शकतात. (Jio ₹15 Unlimited 5G Data Pack)
 
 
 




संबंधित मजकूर