दहशतवादी निधीपुरवठा प्रकरणी ईडीची श्रीनगरमध्ये चार ठिकाणी छापेमारी!

    06-Nov-2026   
 
ED Raids in Srinagar Over Terror Funding Case
 
मुंबई (ED Raids in Srinagar Over Terror Funding Case) : दहशतवादी निधीपुरवठा प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने मंगळवारी श्रीनगरमधील चार ठिकाणी छापेमारी केली. उमर आदिल दार आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेसाठी उमर आदिल दार हा ओव्हर ग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) म्हणून काम करत होता आणि संघटनेशी संबंधित कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता, असा आरोप आहे. याच आरोपांच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
 
यापूर्वी दार आणि त्याच्या साथीदारांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दारने यापूर्वी सुमारे चार वर्षे तुरुंगवासही भोगला आहे. अशी माहिती आहे की, या छापेमारीमागे गुन्ह्यातून मिळवलेल्या संशयित पैशांचा मागोवा घेणे, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि निधीपुरवठ्याचे मार्ग शोधणे, सीमेपलीकडील सूत्रधारांशी असलेले संबंध तपासणे तसेच कथित दहशतवादी निधीपुरवठ्याशी संबंधित अधिक पुरावे गोळा करणे हा उद्देश आहे. (ED Raids in Srinagar Over Terror Funding Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर