मुंबई (Braille Diwali Special Edition 2026) : द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया), नाशिक आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन, लायन्स इंटरनॅशनल - डिस्ट्रिक्ट ३२३१-ए१ यांच्या संयुक्त विद्यमाने 'वन्दे मातरम् - ब्रेल संस्कार भारती - दिवाळी विशेषांक २०२६' चा प्रकाशन व वितरण समारंभ गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता लोकभवन, मुंबई येथे थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे महामहीम राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते या ब्रेल दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लायन्स इंटरनॅशनल - डिस्ट्रिक्ट ३२३१-ए१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मा.लायन पवन कुमार अगरवाल हे उपस्थित होते.
दृष्टीहीन विद्यार्थी आणि वाचकांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद, संस्कार आणि ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा विशेषांक तयार करण्यात आला आहे. सदर अंकाचे वितरण राज्यातल्या सर्व अंध शाळेत मोफत करण्यात येणार आहे. लोकभवनातील कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी ब्रेल साहित्याच्या प्रसाराची गरज आणि दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. (Braille Diwali Special Edition 2026)
या कार्यक्रमाचे आयोजन द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया), नाशिकचे अध्यक्ष श्री.अरुण बारसकर, लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनचे प्रकल्प समन्वयक आणि लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१-ए१ चे जीएलटी चेअरपर्सन लायन विजय रायमाने तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनचे अध्यक्ष लायन जितेंद्र दगडू सकपाळ यांनी केले होते. कमला मेहता अंधशाळा दादर च्या संचालक वर्षा जाधव व प्राचार्य तन्वी महादळकर यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी यांनी प्रार्थना सादर केली व महर्षी कर्वे सॉफ्ट इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून निशा सासमल यांनी १५१ वंदे मातरम उत्सव १५१ दिपावली दिवे सादर केले. (Braille Diwali Special Edition 2026)
या कार्यक्रमाला अपार इंडस्ट्रीजच्या संचालिका नुपूर देसाई, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे, हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पियुश जसरानी, मास्टर मरिन सर्व्हिसचे अध्यक्ष लायन पर्सी मास्टर यांची मोलाची मदत लाभली. यावेळी लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनचे एक्सटेंशन चेअरमन लायन मोहन वायदंडे, बोर्ड ऑफ डायरेक्टर लायन भगवान तलवारे, लायन वीणा दोनवलकर, सेक्रेटरी लायन संजू सासमल, लायन भाग्यश्री वर्तक, लायन नितीन कोलगे, लायन हर्षिता गांवकर, नील सकपाळ व लायन्सचे पदाधिकारी, सदस्य, अंध विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Braille Diwali Special Edition 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक