मुंबई (Bharat Vikas Parishad Samarasata Deepotsav) : भारत विकास परिषद पवई चांदिवली शाखेच्या वतीने विक्रोळी पूर्व येथील अग्रवाल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी ‘समरसता दीपोत्सव: खुशियाँ सबकी, सम्मान सबका और अपनत्व सबके लिए’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. प्रत्येकाला समाजात सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळायला हवी, या भावनेने गरजू महिला व वंचित घटकांसोबत शाखेने यंदाच्या दीपावलीचा आनंद साजरा केला. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील सुमारे ८० गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ, तसेच मातीचे दिवे आणि वातींचे वाटप करण्यात आले. शाखेच्या अनेक सदस्यांनी यासाठी स्वेच्छेने आर्थिक योगदान दिले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम क्षेत्राचे संयुक्त सरचिटणीस महेश शर्मा उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित महिलांच्या मनात आशा आणि विश्वासाचे दीप प्रज्वलित केल. हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय संपर्क उपक्रम सदस्य. राजेंद्र ईनाणी, अरुण सावंत, प्रांत जीव्हीसीए संयोजिका किरण कुमावत, शाखा अध्यक्षा दीप्ती झंवर, सेवा संयोजिका सरोज गुप्ता, संस्कार संयोजिका माधुरी वराळ आणि. संजय काळसेकर यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी ’स्वयं महिला मंडळा’च्यावतीने योगिता साळवी यांनी भारत विकास परिषदेचे आभार मानले. (Bharat Vikas Parishad Samarasata Deepotsav)