मराठी रंगभूमी दिनानिमित्त आशिष शेलार यांच्या शुभहस्ते नाट्य कला अकादमीची घोषणा !

    06-Nov-2026
 
 
 
damle
 
 
 
 मुंबई (विशेष प्रतिनिधी ): Ashish Shelar Prashant Damleसांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्य कला अकादमीची घोषणा करण्यात आली. यावेळी नाट्य कला अकादमी दालनाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.आशिषजी शेलार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला.
ज्ञानेश पेंढारकर यांच्या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे आणि मान्यवर रंगकर्मी उपस्थित होते.Ashish Shelar Prashant Damle
आशिष शेलार यावेळी म्हणाले, मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्य कला अकादमीची घोषणा करीत आहोत. १५० वर्षे रंगभूमी अविरतपणे सुरू आहे. मराठी रंगभूमीने रत्न जन्माला घातली, याचे दाखले जगभरात आहेत. मराठी रंगभूमीने फक्त कलाकारच नाही, तर नेपथ्य, संगीत इत्यादी सर्व अंगांवर काम करणारे रत्न रंगभूमीने अतिशय जोकसपणे उभे केले आहेत. ही कला अकादमी साचेबद्ध नसेल, तर ज्यांच्यामध्ये गुणवत्ता नसेल त्याचा लोभ व्हावा आणि ज्याच्यात गुणवत्ता असेल त्याचे पैलू पाडावेत. त्या गुणवत्तेतून निघणारी नाट्यसृष्टीची परंपरा निर्माण होईल आणि यातून प्रेक्षकांना समाधान मिळेल.Ashish Shelar Prashant Damle
यावेळी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले की, अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन आणि अ.भा. मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य कला अकादमी सुरू करण्यात येणार आहे. या अकादमीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून १८ ते ६० वयोगटातील प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतिमतः यातून नाटकाचा प्रयोग व्हावा, संहिता ते प्रयोग अशा प्रकारची ही कार्यशाळा असेल. आम्ही प्रशिक्षक असलो तरी आजच्या पिढीतील प्रशिक्षकांचाही समावेश करण्यात येईल. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचे जतन, नाट्य प्रशिक्षणाला चालना, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्य क्षेत्रातील विविध कलांचा विकास करणे, या दृष्टीने अकादमी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.Ashish Shelar Prashant Damle
अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नाट्य परिषदेचे महत्त्वाचे काम कलाकार शोधणे, कलाकार घडविणे आणि त्यांना रंगभूमीवर स्थान निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे आहे. यासाठी रंगभूमीशी संबंधित मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून नाट्य कला अकादमी स्थापन करण्याचे ठरले. त्यानंतर शासनाशी संपर्क साधला. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व महसूल विभागांत प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. नाट्य कला अकादमीत नृत्य, संगीत आणि अभिनय या रंगभूमीच्या सर्व अंगांचे प्रशिक्षण रंगभूमीवरील तज्ज्ञ प्रशिक्षक देतील, असे यावेळी दामले म्हणाले.Ashish Shelar Prashant Damle
सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी शासनाच्या विविध स्पर्धांतील ग्रामीण भागातील टॅलेंटला कला अकादमीच्या माध्यमातून पैलू कसे पाडता येतील, याचा विचार करावा, असे सुचविले.Ashish Shelar Prashant Damle
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर 'नाट्य प्रशिक्षणाचे महत्त्व' या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात प्रा. मिलिंद इनामदार, अभिनेते अभय कुलकर्णी, अभिनेते सुशील इनामदार आणि दिग्दर्शक बॉबी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नाट्य प्रशिक्षणाची आवश्यकता, व्यावसायिक रंगभूमीतील प्रशिक्षणाचे महत्त्व, नवोदित कलाकारांसमोरील संधी व आव्हाने आणि दर्जेदार नाट्यनिर्मितीसाठी आवश्यक कौशल्ये यावर विचार मांडले.Ashish Shelar Prashant Damle
 




संबंधित मजकूर