
मुंबई : डीबीएस फाऊंडेशनने आशियातील चार उद्देश-केंद्रित व्यवसायांसाठी ३ दशलक्ष सिंगापूर डॉलर्सच्या (जवळपास २२ कोटी रुपये) निधीची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील तायशो व्हेंचर्सचा (ख्याल) समावेश असून कंपनीला डीबीएस
फाऊंडेशन इम्पॅक्ट बियाँड अवॉर्डअंतर्गत १ दशलक्ष सिंगापूर डॉलर्स (जवळपास ७.४ कोटी रुपये) प्राप्त होतील. हे व्यवसाय आशियातील वाढत्या वयोवृद्ध लोकसंख्येच्या महत्त्वाच्या सामाजिक गरजा सोडवण्याचे काम करत आहेत, ज्यामध्ये ज्येष्ठांसाठी अर्थपूर्ण काम व सामाजिक संपर्क निर्माण करणे, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देखभालीची व्यवस्था करणे आणि ज्येष्ठांना स्वतःच्या घरातच सुरक्षितपणे वृद्धावस्था व्यतीत करण्यास सक्षम करणे यांचा समावेश आहे.
डीबीएस फाऊंडेशन इम्पॅक्ट बियाँड डायलॉग - रिजनल एडिशन मध्ये घोषित करण्यात आलेला हा इम्पॅक्ट बियाँड अवॉर्ड आता दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. हा पुरस्कार दीर्घायुष्याशी जुळवून घेण्यासाठी पिढ्यान्पिढ्यांमध्ये लवचिकता निर्माण करून आणि व्यक्ती कसे जगतात, काम करतात व काळजी घेतात याचा पुनर्विचार करून समाजाला सक्षम करण्याच्या व्यापक प्रयत्नांना निदर्शनास आणतो. भारतातील वयोवृद्ध लोकसंख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना समाजाशी जोडलेले, सक्रिय आणि स्वावलंबी ठेवण्यास मदत करणाऱ्या उपायांची गरज वाढली आहे. २०२५ मधील यूएनएफपीए इंडिया आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या अहवालानुसार[i], २०३० पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या जवळपास १९३ दशलक्षवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर, तायशो व्हेंचर्स ५ दशलक्षहून अधिक वापरकर्ते असलेला भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आघाडीचा प्लॅटफॉर्म ख्यालद्वारे वृद्धांमधील स्वावलंबन, अधिक सहभाग आणि सामाजिक संवादाची गरज पूर्ण करत आहे. ५० हून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी तयार केलेले ख्याल हे तंत्रज्ञान-प्रथम, समुदाय-चालित फिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जे शारीरिक, भावनिक, संज्ञानात्मक, सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल कल्याणासाठी विविध सेवा पुरवते. ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक योग व फिटनेस सत्रे, मेंदूचे प्रशिक्षण, आर्थिक व डिजिटल साक्षरता, सायबर-सुरक्षा प्रोग्राम, स्पर्धा आणि छंद गटांमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच ई-कॉमर्स, आरोग्य विमा आणि ज्येष्ठांसाठी अनुकूल सहली यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅटफॉर्मची प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा ५० अबव्ह ५० ज्येष्ठ नागरिकांना त्यांची प्रतिभा, अनुभव आणि आवडीनिवडी प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.
“डीबीएस फाऊंडेशन इम्पॅक्ट बियाँड अवॉर्डच्या विजेत्यांच्या या नवीन समूहाला डिझाइन थिंकिंगचा अवलंब करताना आणि वेगाने वाढणाऱ्या वृद्ध समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एआयचा वापर करताना पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. आम्हाला
आशा आहे की, हा पुरस्कार या नाविन्यपूर्ण व्यवसायांची प्रभाव पाडण्याची आणि व्यवस्थात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता वाढवेल आणि याद्वारे व्यवसाय समाजोपयोगी परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरू शकतात, हे सिद्ध करेल,” असे डीबीएस फाऊंडेशनच्या प्रमुख कॅरेन न्गुई म्हणाल्या. “लोकसंख्येतील बदल, तंत्रज्ञानातील बदल आणि बदलत्या कामकाजाच्या व
देखभालीच्या गरजांदरम्यान जीवन आणि उपजीविका उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण कटिबद्धता आवश्यक असते. त्वरित मदत महत्त्वाची आहेच, पण त्यासोबत ती स्वावलंबन आणि दीर्घकालीन लवचिकतेचे मार्ग खुले करणारी असावी. आमच्या इम्पॅक्ट
इकोसिस्टमसह आणि डीबीएस बँकेतील आमच्या सहकाऱ्यांचे कौशल्य व कटिबद्धतेसह आम्ही अनेक वर्षांचे उपक्रम चालवतो आणि जीवनाचा टप्पा किंवा परिस्थिती कशीही असली तरी समुदायांना आत्मविश्वासाने भविष्याला सामोरे जाण्यास मदत करणाऱ्या बिझनेसेस फॉर इम्पॅक्टची सर्वांगीण जपणूक करतो,” असे त्या पुढे म्हणाल्या.
ख्यालचे फाऊंडर आणि सीईओ हिमांशू जैन म्हणाले, “डीबीएस फाऊंडेशन इम्पॅक्ट बियाँड अवॉर्ड मिळणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. ख्यालमध्ये आमचे लक्ष एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्यावर केंद्रित आहे, जी ज्येष्ठ नागरिकांना
अधिक निरोगी, स्वतंत्र आणि परिपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करेल. डीबीएस फाऊंडेशनकडून मिळालेली ही मान्यता आमच्या
सध्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यास, आमचा प्लॅटफॉर्म अधिक दृढ करण्यास आणि भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील अधिक ज्येष्ठांपर्यंत आमच्या सेवांचा विस्तार करण्यास मदत करेल, तसेच आग्नेय आशियासारख्या भौगोलिक प्रदेशांमध्ये प्रवेश करण्यास साहाय्य करेल. सक्रिय वृद्धावस्था अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम करत असताना आम्ही आमचा सामाजिक प्रभाव अधिक वाढवण्यास उत्सुक आहोत.”
सिंगापूर, चीन, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया आणि तैवान या डीबीएस बँकेच्या सहा प्रमुख बाजारपेठांमध्ये सामाजिक व आर्थिक लवचिकता वाढवण्याप्रती कटिबद्धतेसह २०१४ मधील स्थापनेपासून फाऊंडेशनने १३ दशलक्षहून अधिक अधिक व्यक्तींच्या
जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे, ५२ उपक्रमांना आणि १८० बिझनेसेस फॉर इम्पॅक्टला पाठबळ दिले आहे, तसेच आजपर्यंत डीबीएस कर्मचाऱ्यांचे १.३ दशलक्ष तास स्वयंसेवक सेवेसाठी प्रेरित केले आहेत. केवळ आर्थिक मदतीपलीकडे
जाऊन डीबीएस फाऊंडेशन क्षमता-बांधणी आणि परिसंस्थेतील सहयोगाच्या माध्यमातून व्यवसायांना मदत करते, तसेच वाढ व सामाजिक प्रभावाला गती देण्यासाठी डीबीएस बँकेचे कौशल्य, मार्गदर्शन आणि नेटवर्कचा लाभ मिळवून देते.
हैदराबादमधील लाइफ सर्कल हेल्थ सर्व्हिसेस २०२५ मधील पहिल्या डीबीएस फाऊंडेशन इम्पॅक्ट बियाँड अवॉर्डच्या विजेत्यांपैकी एक होती, ज्यांना भारतातील ज्येष्ठ नागरिक देखभाल सेवांचा विस्तार करण्यासाठी ५००,००० सिंगापूर डॉलर्स (जवळपास ३ कोटी रुपये) मिळाले होते. हा उपक्रम आरोग्य आणि वैयक्तिक देखभालीच्या गरजेनुसार प्रशिक्षित केअरगिव्हर्सना कुटुंबांशी जोडतो, ज्यामध्ये केअरगिव्हर प्रशिक्षण, प्रमाणीकरण, नोकरी आणि व्यवस्थापित घरगुती देखभाल सेवांचा समावेश
आहे. हा निधी केअरगिव्हर्सची नेमणूक आणि गुणवत्ता हमी दृढ करण्यासाठी नवीन प्रशिक्षण अकॅडमी, डिजिटल शिक्षण साधने आणि तंत्रज्ञान सुधारणांसह मागणी असलेल्या द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये विस्तारासाठी पाठबळ देत आहे.
इम्पॅक्ट बियाँड अवॉर्डच्या दुसऱ्या समूहातील इतर विजेते:
● हॉन यांग हेल्थकेअर - तैवान (१ दशलक्ष सिंगापूर डॉलर्स): रुग्णालये, डॉक्टर्स, फार्मसी, नर्सिंग व दीर्घकालीन देखभाल प्रदाते आणि सहाय्यक-उपकरण भाडेतत्त्वावरील सेवा जोडणारी एकात्मिक पोस्ट-डिस्चार्ज केअर परिसंस्था चालवते. ही संस्था १,५०,००० हून अधिक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि पुनर्वसन रुग्णांना सेवा पुरवते. हा पुरस्कार त्यांच्या सहाय्यक-उपकरणांचे नूतनीकरण व भाडेतत्त्वावरील परिसंस्थेचा विस्तार करण्यास, आरोग्यसेवा क्षेत्रातील सहयोग वाढवण्यास आणि डिजिटल प्लॅटफॉर्म व सेवा वितरण दृढ करण्यास मदत करेल.
● वन बाइट डिझाइन स्टुडिओ - हाँगकाँग (५००,००० सिंगापूर डॉलर्स): त्यांचा प्रोजेक्ट हाऊस “सिल्व्हर पॉवर हब” असे सामुदायिक स्पेसेस तयार करतो, जिथे ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊ शकतात, आपली कौशल्ये शेअर करू शकतात आणि अल्पकालीन, मानधन असलेले मिनी-जॉब्स मिळवू शकतात. हा पुरस्कार दुसऱ्या भागात विस्तारासाठी, सध्याच्या केंद्रातील उपक्रमांना दृढ करण्यासाठी आणि ज्येष्ठांना अशा कामाच्या संधींशी जोडणारा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी मदत करेल.
● शांघाय फुयुआन एल्डरली केअर सर्व्हिस - चीन (५००,००० सिंगापूर डॉलर्स): समुदाय-आधारित वृद्ध देखभाल सेवा पुरवते, जी आरोग्य, पुनर्वसन आणि सक्रिय वृद्धावस्था सेवांची सांगड घालून ज्येष्ठांना आपल्याच घरात सुरक्षितपणे जगण्यास सक्षम करते. संपूर्ण शांघायमध्ये ५० हून अधिक सेवा केंद्रे आणि दररोज १०,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक भेटींसह हा पुरस्कार त्यांच्या मॉडेलचा विस्तार करण्यास, भागीदारी व सेवा मानक दृढ करण्यास आणि वंचित व गरजू ज्येष्ठांपर्यंत सेवांची पोहोच सुधारण्यास
मदत करेल.